आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवानमधील 96 वर्षांच्या वृद्धाची कलाकृती पाहण्यासाठी रेनबो व्हिलेजमध्ये दरवर्षी 10 लाख पर्यटकांची होतेय गर्दी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताइपे - चीनमधील तायचुंग सरकारने २००८ मध्ये तैवानमधील २८ लाख लोकसंख्येची गावे नष्ट करण्याचे आदेश दिले होते. यानंतर ९६ वर्षीय वृद्ध कलावंत हुआंग युंग-फू यांनी गावातील बहुतांश घरांवर चित्रे साकारली. काही काळानंतर लोक गावात आले तेव्हा त्यांना गाव पूर्वीपेक्षा खूप सुंदर दिसत होते. मग ८० हजार लोकांनी गाव वाचवण्यासाठी ई-मेल पाठवले व हुआंग यांनी घेतलेल्या श्रमाचे महत्त्व सरकारपर्यंत पोहोचवले. परिणामी, सरकारला आपला निर्णय बदलावा लागला. आता हे गाव 'रेनबो व्हिलेज' ओळखले जाऊ लागले. 

 

चित्रकार असल्याने 'ग्रँडपा रेनबो' म्हणतात 
हुआंग युंग-फू यांनी सांगितले, रात्रीतून घरांच्या भिंती, दरवाजे, व्हरांडे व खिडक्यांवर चित्रे काढण्यास सुरुवात केली. आपल्या सोबत एक स्टूल, रंग आणि ब्रश घेऊन ते बाहेर पडत. दररोज ३-५ तास ते चित्रे काढत असत. हुआंग यांना ग्रँडपा रेनबो या नावानेच लोक त्यांना संबोधतात. 

 

५ व्या वर्षांपासूनच, चित्रकलेचा छंद 
हुआंग यांना वयाच्या ५ वर्षांपासूनच चित्रकलेचा छंद लागला. १९३७ मध्ये १५ वर्षांचे असताना ते घरातून पळून गेले. चीन-जपानमध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धात त्यांनी चिनी सैन्याकडून लढा दिला. त्यानंतर नॅशनलिस्ट पार्टीचे नेते चियांग काय शेक व २० लाख सैन्यास निर्वासित करण्यात आले. यात हुआंग यांचा समावेश होता. 

बातम्या आणखी आहेत...