आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वुहानमध्ये न्यूमोनिया वाढताच तैवान सक्रिय,आधीच तपासणी केली सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या शांघाय शहरातील बस अल्ट्राव्हायलेट किरणांपासून मुक्त केले जात आहे. - Divya Marathi
चीनच्या शांघाय शहरातील बस अल्ट्राव्हायलेट किरणांपासून मुक्त केले जात आहे.
  • कोरोनाचा आतापर्यंत १, ४९, ५९६ लोकांना संसर्ग; ५ हजार ६०४ जणांचा मृत्यू, बचाव सुरू
  • जगभरात : इक्वेडोरमध्ये पहिला मृत्यू, इटलीत उद्यानात जाण्यास मनाई, सौदीने केली उड्डाणे रद्द

तैपेई - चीनचा शेजारी देश तैवानने कोरोना िवषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रभावी पावले उचलली असून त्यावरून जगाला धडा घेता येऊ शकेल. चीनच्या वुहानमधून कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. खरे तर तेथून तैवान १३० किमी अंतरावर. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अनेक चिनी लोक नवीन वर्ष साजरे करून तैवानला परतले होते. त्याचवेळी चीनमधून २ हजार पर्यटक येत होते. असे असूनही तैवानमध्ये आतापर्यंत केवळ ५० प्रकरणे समोर आली. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. तैवानची लोकसंख्या २.३० कोटी आहे. 

या उपाययोजनेतून यशस्वी 

> चीनने ३१ डिसेंबरला पहिल्यांदा जागतिक आरोग्य संघटनेला वुहानमध्ये अनेक लोक न्यूमोनियाने ग्रस्त असल्याचे कळवले. त्याच दिवसापासून तैवानने सतर्क होत आपल्या विमानतळावर चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी सुरू केली. येथील विमानतळांवर २००३ च्या सार्स संकटापासून तापमान मोजणारी यंत्रणा लावलेली आहे. त्याद्वारे ताप तसेच विषाणूचे परीक्षण केले जाते. तैवानने सार्समुळे झालेल्या ७३ जणांचा मृत्यूमधून धडा घेतला होता. 

> १२ जानेवारीला संपूर्ण तैवानमध्ये तपासासाठी तज्ञ नेमण्यात आले. सर्व रुग्णालयांत बाधितांचा तपास, त्यांचा अहवाल लवकर तयार करण्यासाठी टीम स्थापन. संशयितांना स्वतंत्र ठेवले जात होते. > तैवानमध्ये पहिले प्रकरण २१ जानेवारीला समोर आले. त्यानंतर १२४ कृती दलांकडे देशाची धुरा सोपवली. तैवानने २६ जानेवारीला चीनहून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली. वुहान येथून येणाऱ्या प्रवाशांवर ७० हजार रुपयांचा दंड लावला. ताप असतानाही या प्रवाशांनी माहिती दडवली होती.  > मास्कच्या निर्यातीवर बंदी. रेशनिंग सिस्टिम लागू करून लाेकांना कमी किमतीत भोजन दिले. 

> टीव्ही व रेडिआे वाहिन्यांच्या माध्यमातूून ते दर तासाला लोकांना कोरोना विषाणूपासून संरक्षणाचा संदेश प्रसारित करत होते. परिणामी ९५ टक्के लोकांनी मुलांचे तापमान घरीच तपासण्यास सुरुवात केली. 

> कार्यालय, शाळा, क्रीडा केंद्रांच्या इमारतींना नियमित तापमान तपासणी अनिवार्य. सार्वजनिक ठिकाणांवर उपग्रह ठेवले. शालेय मुलांना प्लास्टिकचे डिव्हायडर दिले. दावा : लक्षण दिसण्याआधीच व्हायरसचा संसर्ग 
 
टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी एक दावा केला आहे. कोरोनाचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होण्यासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी वेळ लागतो, असा दावा संशोधन टीमचे सदस्य लॉरेन अँसेल मेयर्स यांनी केला आहे. सुरुवातीची लक्षणे न दिसलेल्या व्यक्तींद्वारेच सुमारे १० टक्के रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. संसर्गाचा वेग दोन गोष्टींवर अवलंबून असतो. एक व्यक्ती किती जणांच्या संपर्कात येतो? अशा लोकांत त्याचा संसर्ग होण्यासाठी किती वेळ लागतो? दुसरी स्थिती कमी असेल तितका त्याचा संसर्ग जास्त असल्याने रोखणे कठीण होऊ शकते.
 स्पष्टीकरण : अमेरिकेत ज्वर, ४ महिन्यांत २० हजार मृत्युमुखी
> अमेरिकेत रोग नियंत्रण केंद्राचे (सीडीसी) प्रमुख रॉबर्ट रेडफील्ड म्हणाले, अमेरिकेत गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून आतापर्यंत सुमारे ३.४ कोटी लाेकांना तापेतून संसर्ग झाला. त्यापैकी ३.५ लाख रुग्णांवरील उपचार रुग्णालयात झाले. २० हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू तापाने झाला. > अमेरिकेत संसदेच्या कनिष्ठ सभागृहात कोरोना व्हायरससंबंधी एक विधेयक पारित करण्यात आले. त्यानुसार कोरोना संसर्ग झालेला रुग्ण सुट्टी घेत असल्यास त्याच्या वेतनात कपात करता येणार नाही. पुढील आठवड्यात हे विधेयक वरिष्ठ सभागृह सिनेटच्या पटलावर सादर केले जाणार आहे.७४ दिवसांत ४९ टक्के रुग्ण झाले बरे


> इटलीत उद्यानात फिरण्यास मनाई.


> झेक रिपब्लिकमध्ये २४ मार्चपर्यंत रेस्तराँ, पब बंद,


> द. आफ्रिकेने वुहानमधून १४६ नागरिक बाहेर काढले.  


> रशिया : पोलंड व नॉर्वे सीमा बंद केली.


> स्पेनमध्ये एक दिवसात १५०० नवीन प्रकरणे


> सौदीने आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली.


> इक्वेडोरमध्ये कोरोनामुळे पहिला बळी.

बातम्या आणखी आहेत...