आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Taiwan Helicopter Crash Kills Eight With Defence Deputy Ministers, Luckily Five Survived In Accident

तैवान हेलिकॉप्टर दुर्घटनेत संरक्षण उप मंत्र्यांसह आठ जण ठार, सुदैवाने अपघातातून पाच जण बचावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैवान : तैवानमध्ये गुरुवारी लष्करप्रमुख आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह १३ जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळल्याने झालेल्या अपघातात उप संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुख शेन यी- मिंग यांच्यासह ८ जणांचा मृत्यू झाला.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एक यूएच- ६० ब्लॅक हॉक लष्करी हेलिकॉप्टर भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहाच्या सुमारास यिलन शहराच्या डोंगराळ भागात कोसळले. आधी हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. या हेलिकॉप्टरमध्ये तैवानचे लष्करप्रमुख शेन यी- मिंग आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी होते. हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागात कोसळले. वृत्तानुसार राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने एका पत्रकार परिषदेत सांगितले की, पाच जण या अपघातातून बचावले. हेलिकॉप्टरने ताइपेहून ईशान्य यिलान काउंटीसाठी रवाना झाले होते. शेन यी- मिंग चीनचे कट्टर विरोधक मानले जायचे. त्यांनी यंदा मे मध्ये चीनच्या धमक्यानंतर अमेरिकेकडून लढाऊ विमाने मागवली होते.
 

बातम्या आणखी आहेत...