आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवान : कायदा झाल्यानंतर ३०० हून अधिक समलैंगिकांनी केले लग्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैइपे - तैवानमध्ये समलैंगिकांच्या विवाहाचा कायदा मंजूर झाल्यानंतर ३०० हून अधिक जोडप्यांनी लग्न केले. शुक्रवारी कायदेशीररित्या वैध कार्यक्रमात लग्नाच्या बंधनात अडकलेले समलैंगिक खुश दिसले. एका जोडप्यांने सांगितले, आम्ही या लग्नामुळे आनंदी झालो आहोत. कारण लग्नासाठी मला दहा वर्षे वाट पाहावी लागली. गेल्या आठवड्यातच तैवानच्या संसदेत समलैंगिक विवाहाचा कायदा संमत झाला. असा कायदा मंजूर करणारा आशियातील पहिला देश झाला आहे. २०१७ मध्ये तैवानच्या न्यायालयाने समलैंगिक जोडप्यांना आपसात लग्न करण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिला होता.