आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'टकाटक'मध्ये बोल्ड दृष्ये देणारी प्रणाली आता युवा डान्सिंग क्वीनच्या स्पर्धेत, मंचावर दाखवणार नृत्याचा जलवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री प्रणाली भालेराव हिने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. टकाटक या चित्रपटातून तिने पदार्पण केल्यानंतर मराठी सिनेसृष्टीला प्रणाली सारखी एक बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री मिळाली. आता प्रणाली एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या बोल्ड अदा पाहून तर महाराष्ट्र घायाळ झालाच आहे पण आता तिचं नृत्य कौशल्य पाहून देखील थक्क होणार आहे कारण ही बिनधास्त अभिनेत्री झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.


'युवा डान्सिंग क्वीन' मधील तिच्या या नवीन प्रवासाबद्दल बोलताना प्रणाली म्हणाली, "एका सामान्य महाराष्ट्रीयन कुटुंबात वाढलेली असताना मी मॉडलिंग क्षेत्रात खूप जिद्दीने आणि मेहनतीने प्रवेश केला. त्यातूनच मला चित्रपटात पदार्पणाची संधी मिळाली. मी एक नॉन-डान्सर आहे. पण माझी जिद्द आणि चिकाटीचं या कार्यक्रमाच्या मंचापर्यंत घेऊन आली आहे आणि युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमामुळे माझं नृत्य कौशल्य अजून प्रभावी बनेल. हा कार्यक्रम मला एक उत्तम कलाकार बनण्यास नक्कीच मदत करेल याची मला खात्री आहे."