Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Take action against teachers who have not present even after transfer : Ghule

बदली होऊनही हजर न झालेल्या शिक्षकांवर कारवाई करा : घुले

प्रतिनिधी | Update - Aug 28, 2018, 11:18 AM IST

बदली होऊनही हजर न झालेल्या व रूजू होऊन दीर्घरजेवर गेलेल्या प्राथमिक शिक्षकांवर कारवाई करावी, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या

  • Take action against teachers who have not present even after transfer : Ghule

    नगर- बदली होऊनही हजर न झालेल्या व रूजू होऊन दीर्घरजेवर गेलेल्या प्राथमिक शिक्षकांवर कारवाई करावी, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभापती राजश्री घुले यांनी सोमवारी दिली.


    शिक्षण समितीच्या सभेत प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या धोकादायक असलेल्या इमारतींमधील विद्यार्थ्यांची सोय पर्याय ठिकाणी करण्याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. रिक्त असलेल्या गटशिक्षणाधिकारी व अधीक्षक (शालेय पोषण आहार) पद भरण्याबाबत शासनाला विनंती करण्याचा ठराव घेण्यात आला. पट वाढवणे, पट टिकवण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी ३० सप्टेंबरपूर्वी कार्यशाळा घेण्याची सूचना करण्यात आली. पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी २८ ते ३१ सप्टेंबरदरम्यान घेण्याची सूचना देण्यात आली. सदस्य राजेश परजणे, गटनेते जालिंदर वाकचौरे, शिवाजीराव गाडे, विमल आहे, राहुल झावरे आदी यावेळी उपस्थित होते. सभेचे कामकाज शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, सुनंदा वाखारे यांनी पाहिले.

Trending