Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Take administrative approval for work of jalyukt shivar before the voting

जलयुक्त शिवार योजनेमधील कामांना आचारसंहितेपूर्वी प्रशासकीय मंजुरी घ्या

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 10:34 AM IST

२०१८-१९ या वर्षातील जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कामांची मंज

 • Take administrative approval for work of jalyukt shivar before the voting

  सोलापूर- २०१८-१९ या वर्षातील जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कामांची मंजुरी अडकू नये, यासाठी त्यापूर्वीच सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी घेण्याचे आदेश रोहयो उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांनी दिले.


  २०१७-१८ या वर्षातील जी कामे अपूर्ण आहेत, ती नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही श्री. पवार यांनी दिले. जिल्हा परिषदेकडून होत असलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त करीत मुदतीत कामे पूर्ण करावी अन्यथा संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात येणार अाहे.


  जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.


  श्री. पवार यांनी २०१६-१७ मध्ये झालेल्या कामांचे ज्या विभागांनी फोटो अपलोड केले नाहीत, त्यांनी फोटो अपलोड करावेत, कृषी विभागांनी जलमित्र पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. २०१७-१८ मधील १० हजार ११८ कामांपैकी ७ हजार ३५३ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये कृषी विभागाकडून ५ हजार ८७९ कामे पूर्ण केली आहेत. जलसंधारण विभागाकडे २८६ पैकी ११७ कामे पूर्ण झाली आहेत, ग्रामपंचायत विभागाकडील १४५० पैकी ६०० कामे पूर्ण झाली आहेत. जी कामे अपूर्ण आहेत, ती नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पवार यांनी दिले.


  जिल्हा परिषदेकडील कामे अपूर्ण
  जलयुक्त शिवार योजनेतून २०१७-१८ या वर्षात जिल्हा परिषदेकडे ६८१ कामे दिली होती. त्यापैकी ३१७ कामे पूर्ण झाली आहेत. अद्याप ३६४ कामे अपूर्ण आहेत. ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर होता, यापैकी १२ कोटी खर्च झाले असून ३० कोटींचा िनधी अखर्चित आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित अधिकारी दखल घेत नसल्याबद्दल श्री. पवार यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. विभागीय आयुक्तांनी डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पण जिल्हा प्रशासनाने नोव्हेंबर अखेरपर्यंत कामे पूर्ण करावीत, असे बैठकीत सांिगतले.


  ८० टक्के कामांना प्रशासकीय मंजुरी
  २०१८-१९ या वर्षात ३८५९ कामांचा समावेश आहे. यामध्ये १२६१ कामे लोकसहभागातून तर २५९८ कामे शासन निधीतून करण्यात येणार आहेत. या कामांना आचारसंहिता लागण्यापूर्वी आचारसंहिता घ्यावी, ज्यामुळे कामे रद्द होणार नाहीत. २५ ऑगस्टपर्यंत ८० टक्के कामांना प्रशासकीय मंजुरी घेण्यात आल्याची माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी पवार यांनी दिली.

Trending