आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Take Care While Drinking Milk ! 48% Of Dairy Milk And 37.7% Of The Packet Milk Is Bad

दूध पिताना जरा जपून! सुट्या दुधाचे 48% तर पाकीटबंदचे 37.7% नमुने दोषी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश असूनही भारतीयांना शुद्ध दूध मिळत नाही. भारतीय अन्न सुरक्षा तसेच मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) तपासणीत प्रोसेस्ड म्हणजे पाकीटबंद दुधाचे ३७.७% नमुने गुणवत्तेच्या निकषांत फेल ठरले आहेत. नियमानुसार या निकषांत एकही नमुना दोषपूर्ण ठरायला नको. दुसरीकडे, सुट्या दुधाचेही ४७% नमुने दोषी ठरले. धक्कादायक बाब म्हणजे पाकीटबंद दुधाच्याही १०.४% नमुन्यांत मानकांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. सुट्या दुधाबाबत हा आकडा ४.८% आहे. पाकीटबंद आणि सुटे दूध असे एकूण ४१% नमुने दोषपूर्ण आढळले.

एफएसएसएआयचे सीईओ पवन अग्रवाल यांनी शुक्रवारी राष्ट्रीय दूध गुणवत्ता सर्व्हे-२०१८ जाहीर करून ही स्थिती गंभीर असल्याचे सांगितले. घेतलेल्या एकूण ६,४३२ नमुन्यांत सर्वाधिक भेसळ तेलंगणात, त्यानंतर मध्य प्रदेश व केरळमध्ये आढळून आली.

93% नमुन्यांतील दूध पिण्यायोग्य, परंतु गुणवत्ता कमी झाली... 
- मध्य प्रदेशातून घेतलेल्या 335 नमुन्यांत 23, महाराष्ट्रात 678 पैकी 9, गुजरातमध्ये 456 पैकी 6, राजस्थानात 314 पैकी 4 नमुन्यांत प्रतिजैविकेही सापडली.
- दिल्लीतील 262 पैकी 38, पंजाबमध्ये 29, महाराष्ट्रात 20, राजस्थानात १३ नमुन्यांत एफ्लाटॉक्सिन एम-1 आढळले.
- एफ्लाटॉक्सिन एम-१ पाकीटबंद दुधात अधिक. तामिळनाडू, दिल्ली आणि केरळ राज्यांतील नमुन्यांत एफ्लाटॉक्सिन एम-1 अधिक प्रमाणात.
- पाकीटबंद दूध प्रक्रियेत सुरक्षा मानकांचा विचारच केला नसल्याचे 7% नमुन्यांत आढळून आले.

चिंता : दुधातील घातक पदार्थ तपासण्यासाठी देशात कुठेही अद्याप उपयुक्त अशी प्रयोगशाळा नाही
एफएसएसएआयने २०१८ मध्ये मे ते ऑक्टोबर १,१०३ शहरांत ६,४३२ नमुने घेतले. यातील ४०% पाकीटबंद तर उर्वरित सुट्या दुधाचे होते. देशात प्रथमच हे व्यापक सर्वेक्षण झाले. अग्रवाल म्हणाले, 'दुधाच्या तपासणीसाठी देशात अद्याप उपयुक्त अशी प्रयोगशाळा नाही.' भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. २०१७-१८ मध्ये देशात १७.६३ कोटी टन दूध उत्पादन झाले होते. सरकारने २०२२ पर्यंत २५.४५ कोटी टनांचे लक्ष्य ठेवले आहे.

मोठ्या ब्रँडच्या दुधात भेसळ कमी, दूषित अधिक
एफएसएसआयचे सीईओ पवन अग्रवाल म्हणाले, दुधात खूप मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याची सामान्य नागरिकांची भावना आहे. वास्तविक अभ्यासानुसार दुधात भेसळीपेक्षा स्वच्छतेच्या अभावाची समस्या आहे. मोठ्या ब्रँडचे पाकीटबंद दूधही दूषित आहे. यामुळे हे थांबवणे गरजेचे झाले आहे.' ते म्हणाले, की एफ्लाटॉक्सिन एम-१, प्रतिजैविक आणि कीटकनाशकासारखे पदार्थ पाकीटबंद दुधात अधिक सापडले. संघटित डेअरी क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. अग्रवाल म्हणाले, 'डेअरी उद्योग आमच्या अभ्यासाला आव्हान देऊ शकते, मात्र सुरक्षा निकषांचे त्यांना काटेकोर पालन करावेच लागेल. सोबत १ जानेवारी २०२० पासून पूर्ण साखळीत तपासणी आणि निरीक्षणाची व्यवस्था करावी लागेल. दुधात एफ्लाटॉक्सिन एम-१ चाऱ्यातून येते. यासाठी शेतकऱ्यांना सरकारने जागरूक करणे गरजेचे झाले आहे.'

दिलासा: एकूण ६,४३२ नमुन्यांत फक्त १२ मध्ये प्रतिजैविक, युरिया व कीटकनाशक सापडले
देशभरातील ६,४३२ नमुन्यांपैकी १२ मध्ये युरिया, डिटर्जंट, हायड्रोजन पॅरॉक्साइड व न्यूट्रलायझर पदार्थ आढळले. ३६८ नमुन्यांत एफ्लाटॉक्सिन एम-१, ७७ मध्ये प्रतिजैविक तर एका नमुन्यांत कीटकनाशक सापडले. १२५५ नमुन्यांत फॅट, २१६७ मध्ये एसएनएफ, १५६ मध्ये माल्टोडेक्सट्रिन आणि ७८ नमुन्यांत साखर सापडली. अग्रवाल म्हणाले, की हे दूध निकषांनुसार नसले तरी आरोग्यासाठी नुकसानीचे नाही. ९३% दूध पूर्णपणे सुरक्षित आढळले.

बातम्या आणखी आहेत...