आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीची बंपर ऑफर: फक्त 10,100 रुपयांमध्ये घरी घेऊन या नवी सेंट्रो कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. चार दिवसांपुर्वीच हुंडई द्वारे नवी सेंट्रो कार लॉन्च करण्यात आली. यावर जबरदस्त ऑफर सुरु आहे. तुम्ही अवघ्या 10,100 रुपयांमध्ये स्वतःची नवी सेंट्रो कार घरी घेऊन जाऊ शकता. कंपनीने दिवाळीच्या निमित्ताने ही ऑफर सुरु केली आहे. कंपनीने कार बुकिंग पाहता एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी बुकिंग अमाउंटमध्ये 10 टक्के कॅशबॅक ऑफर सुरु केली आहे. यापुर्वी तुम्हाला बुकिंग अमाउंट 11100 रुपये द्यावे लागत होते. ही स्किम किती दिवस राहणार आहे याविषयी तुम्हाला सांगत आहोत. 


कार खरेदी करण्याची चांगली संधी 
कंपनीकडून आता कारवर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. कंपनीने पहिले बुकिंग अमाउंटची सुरुवात 11,100 रुपये केली होती. कंपनीकडून ही ऑफर सध्या सुरु आहे. सुरुवातीच्या 50 ग्राहकांना बुकिंगसाठी 11,100 रुपये जमा करायचे आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने ऑनलाइन कार बुकिंग केली तर तुम्हाला यावर 10 टक्के कॅशबॅक मिळवता येऊ शकते. म्हणजेच तुम्हाला एकूण 10,100 रुपये भरावे लागतील.

 

30 नोव्हेंबरपर्यंत वेळ 
नवीन सेंट्रोची बुकिंग करुन तुम्ही दिवाळीच्या दिवशी घर आणि कुटूंबाला एक नवीन गिफ्ट देऊ शकता. कंपनीच्या वेबसाइटवरुन 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन बुकिंग केली जाऊ शकते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही एचडीएफसीमधूनच ऑटो लोन घेतले तरच तुम्हाला ही कॅशबॅक ऑफर मिळू शकते. नवी सेंट्रोमध्ये 1.1 लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये सीएनजीचा पर्यायही आहे. नव्या सेंट्रोमध्ये ऑटोमेटिक पर्यायही उपलब्ध आहे.

 

23,500 यूनिट झाली आहे बुक 
हुंडई सेंट्रो 2018 कार निर्माता कंपनी हुंडईने 23 अक्टोबरला हॅचबॅक कार सेंट्रोल लॉन्च केली होती. नव्या सेंट्रोमध्ये नाव वगळता सर्व बदलण्यात आले आहे. नवीन सेंट्रो कारची लोकांना दिर्घकाळापासून प्रतिक्षा होती. कंपनीकडून कार बुकिंग 10 अक्टोबरपासून सुरु करण्यात आली होती. अवघ्या 12 दिवसात 23,500 यूनिट बुकिंग झाली. 

बातम्या आणखी आहेत...