Home | Business | Auto | take home these 5 bikes for less than 50 thousand rupees, get upto 100 kmpl mileage

50 हजारांच्या आत घरी आणा या 5 Bike; पेट्रोलची चिंता नको, 100 KMPL पर्यंत मायलेज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 14, 2018, 02:18 PM IST

आम्ही आपल्यासाठी अशा 5 बाइक घेऊन आलो, ज्यांच्या किमती 50 हजार रुपयांच्या आत आहेत. तरीही त्या 100 KMPL मायलेज देऊ शकतील.

 • take home these 5 bikes for less than 50 thousand rupees, get upto 100 kmpl mileage

  ऑटो डेस्क - गेल्या काही महिन्यांपासून टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. त्यातही प्रामुख्याने 100-110 सीसी सेगमेंटच्या बाइक लोकांमध्ये प्रचंड लोकप्रीय होत आहेत. प्रत्येक कंपनी या रेंजमध्ये ग्राहकांना जास्तीत-जास्त सुविधा, मायलेज आणि परवडणाऱ्या किमती देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात बजेट बाइकमध्ये लोकांना जितके पर्याय मिळाले तितकीच त्यापैकी एकाची निवड करण्यासाठी तारांबळ उडत आहे. त्यामुळेच, आम्ही आपल्यासाठी अशा 5 बाइक घेऊन आलो आहे ज्यांच्या किमती 50 हजार रुपयांच्या आत आहेत. तरीही त्या 100 किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकतात.


  1. टीव्हीएस स्‍टार सि‍टी प्‍लस
  टीव्हीएसने 110 सीसी सेगमेंटमध्ये स्‍टार सि‍टी प्‍लस प्रस्तुत केली. यानंतर कंपनीची ग्राहकांवरील पकड आणखी मजबूत झाली. या बाइकमध्ये सेमी डि‍जि‍टल इंस्‍ट्रूमेंट कन्सोलचे ईको मीटर, सर्व्हिस रीमाइंटर, इलेक्‍ट्रि‍क स्‍टार्टसह बटन टायर्स आहेत.


  किंमत: 46 ते 51 हजार रुपये (एक्‍स शोरूम दि‍ल्‍ली)
  इंजिन: 109.7 सीसी
  पॉवर: 8.4 पीएस
  टॉर्क: 8.7 एनएम
  मायलेज: 86 kmpl


  पुढील स्लाइड्सवर पाहा, 50 हजरांत घेता येतील अशा इतर 4 बाइक...

 • take home these 5 bikes for less than 50 thousand rupees, get upto 100 kmpl mileage

  2. हिरो स्‍प्‍लेंडर प्‍लस

  हिरोची सर्वात लोकप्रीय बाइक रेंज स्‍प्‍लेंडरमध्ये आपण स्‍प्लेंडर प्‍लस खरेदी करू शकता. हिरो स्‍प्‍लेंडर देशात सर्वाधिक विकल्या जाणारी बाइक आहे.

  किंमत: 48 हजार ते 51 हजार रुपयांपर्यंत
  इंजिन: 97.2 सीसी
  पॉवर: 8.36 पीएस
  मायलेज: 80.6 kmpl

 • take home these 5 bikes for less than 50 thousand rupees, get upto 100 kmpl mileage

  3. बजाज प्‍लॅटि‍ना कॉमफरटेक

  बजाज टू-व्‍हीलर्सची दुसरी सर्वात किफायतशीर बाइक म्हणूनही प्‍लॅटि‍ना कॉमफरटेकला ओळखले जाते.

  किंमत: 47,355 रुपये
  इंजिन: 102 सीसी
  पॉवर :8.1 बीएचपी
  माइलेज: 90 kmpl

 • take home these 5 bikes for less than 50 thousand rupees, get upto 100 kmpl mileage

  4. बजाज सीटी 100

  बजाज सीटी 100 देशातील सर्वात स्वस्त मोटरसायकल आहे. बजाज सीटी 100 चे मायलेज 90 कि‍मी प्रति‍ लिटर असल्याचा कंपनीचा दावा आहे. 

  किंमत: 32 हजार ते 39,552 रुपये
  इंजिन: 99.2 सीसी सिंगल सि‍लेंडर
  पॉवर: 8.08 बीएचपी
  मायलेज: 100 kmpl

 • take home these 5 bikes for less than 50 thousand rupees, get upto 100 kmpl mileage

  5. हिरो एचएफ डिलक्‍स

  हिरोची दुसरी मोटरसायकल एचएफ डिलक्‍स सुद्धा आपण 50 हजार रुपयांच्या आत खरेदी करू शकता. या बाइकमध्ये 97.2 सीसी इंजिन आहे. तसेच एका लिटरमध्ये 82 कि‍मींचे मायलेज देऊ शकते.

  किंमत: 43 हजार रुपये ते 48 हजार रुपये
  इंजिन: 97.2 सीसी
  पॉवर: 8.36 पीएस
  मायलेज: 82 kmpl

Trending