आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेक जॉब्ज वर्ष 2019 मध्ये घेऊन येणार अनेक नवनवीन संधी; जाणून घ्या कोणत्या शहरात आहे किती जॉब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय) व ऑटोमेशन यासारख्या उगवत्या तंत्रज्ञानामुळे नाेकऱ्यांचे प्रमाण कमी हाेणार नाही, तर ही दाेन्ही क्षेत्रे राेजगार वाढण्याचे मुख्य कारण बनतील व ते तुलनात्मकदृष्ट्या आकर्षकही असतील. तथापि, अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाने पारंपरिक उद्याेग-व्यवसाय क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण झालेली आहे, हे निश्चित; परंतु यात घाबरून जाण्याची गरज नाही. कारण बिझनेस सेक्टरमध्ये टेक्नो-फ्रेंडली व टेक्नाॅलॉजिकल ट्रेंड्सचे जाणकार असलेल्यांची मागणी खूप वाढली आहे. आज तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय नव्या पद्धतीने स्थापित होत असल्याने नवनवीन तंत्रज्ञान व ट्रेंड‌्सशी संबंधित काैशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी माेठ्या प्रमाणावर वाढत आहे. 

 

लीडिंग ग्लोबल ई-लर्निंग कंपनी 'सिम्पली लर्न'च्या एका अहवालानुसार वर्ष २०१८ मध्ये उगवत्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक प्रकारचे नवनवीन राेजगार समाेर आले आहेत. 'डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अॅंड फ्यूचर ऑफ टेक जॉब्ज इन इंडिया' नावाच्या या अहवालातून डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड काॅम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी व डिजिटल प्रोजेक्ट मॅनेजमेंट यासारख्या फ्यूचर जॉब्जचे प्रमुख डोमेन्स समाेर आले आहेत. एका अभ्यासानुसार या डाेमेन्समध्ये वार्षिक अंदाजे वेतन अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे. जसे- डेटा सायंटिस्ट या पदासाठी २५ लाख रुपये, एआय इंजिनिअरच्या पदासाठी २० लाख रुपये, क्लाऊड आर्किटेक्टसाठी १८ ते ३० लाख रुपये, सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट पदासाठी २२ ते ३२ लाख रुपये आणि डिजिटल प्रोजेक्ट मॅनेजरसाठी १५ ते २४ लाख रुपये असे अंदाजे वार्षिक वेतन असेल. तसेच या पाच मुख्य पदांसाठी बंगळुरू, दिल्ली, पुणे, चेन्नई, हैदराबाद व मुंबईसारख्या महानगरांत अनेक राेजगारांची निर्मिती केली जात आहे, हे विशेष! 


डेटा सायंटिस्ट्स 
हे व्यावसायिक डेटाच्या माध्यमातून व्हॅल्यू क्रिएशन करण्याचे काम करतात. तसेच अधिक चांगले परिणाम मिळण्यासाठी सक्रिय राहून विविध स्रोत व विश्लेषणांतून माहिती काढतात. 

मुख्य शहरे व तेथे उपलब्ध नाेकऱ्यांची स्थिती 
बंगळुरू 41.9% 
दिल्ली 15.3% 
पुणे 8.9% 
चेन्नई 8.5% 
हैदराबाद 11.0% 
मुंबई 14.3% 

 

एआय इंजिनिअर्स 
हे असे एआय प्रोग्रामर्स असतात, जे रोबोटिक्स क्षेत्रासाठी ऑपरेटिंग सॉफ्टवेअर्स डेव्हलपमेंटचे काम करतात. हे लाेक एआय प्रोग्राम्स व अॅप्लिकेशन्सही तयार करतात.
प्रमुख शहरे व तेथे उपलब्ध नाेकऱ्यांची स्थिती 
बंगळुरू 21.5% 
दिल्ली 29.7% 
पुणे 12.8% 
चेन्नई 12.7% 
हैदराबाद 10.7% 
मुंबई 12.7% 


क्लाऊड आर्किटेक्ट्स
एक व्यावसायिक म्हणून क्लाऊड आर्किटेक्ट्स हे काेणत्याही कंपनीसाठी क्लाऊड काॅम्प्युटिंग सिस्टिमचे धाेरण आखून ते तयार करतात. याची सर्वस्वी जबाबदारी यांच्यावरच असते.
प्रमुख शहरे व तेथे उपलब्ध नाेकऱ्यांची स्थिती 
बंगळुरू 48.5% 
दिल्ली 04.9% 
पुणे 16.2% 
चेन्नई 08.5% 
हैदराबाद 12.5% 
मुंबई 09.3%  


डिजिटल मॅनेजर्स 
हे तज्ञ संकेतस्थळे, मोबाइल अॅप्स यासारखे प्रकल्प तयार करण्याचे काम करताना त्यासाठी शाेध-संशाेधन, नियाेजन, प्राॅडक्शन, डिप्लॉयमेंट व मेंटेनन्स आदी कामांचे संपादन किंवा नियंत्रण करत असतात.

प्रमुख शहरे व तेथे उपलब्ध नाेकऱ्यांची स्थिती 
बंगळुरू 19.3% 
दिल्ली 17.2% 
पुणे 16.4% 
चेन्नई 19.0% 
हैदराबाद 16.3% 
मुंबई 11.7%  


सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट‌्स 
हे तज्ञ काेणत्याही कंपनीच्या काॅम्प्युटर सिस्टिमची सुरक्षितता सांभाळण्याचे काम करतात. एखादा हॅकर कसा विचार करू शकताे, याचा अंदाज बांधून या पदावर काम करावे लागत असते. 
प्रमुख शहरे व तेथे उपलब्ध नाेकऱ्यांची स्थिती 
बंगळुरू 33.5% 
दिल्ली 14.8% 
पुणे 13.3% 
चेन्नई 10.8% 
हैदराबाद 11.8% 
मुंबई 15.8% 
*अनुभवाच्या आधारे वेतन कमी अथवा जास्त होऊ शकते.