आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगती करायची असल्यास जोखीम पत्करा

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • वेग‌ळ्या धाटणीचे चित्रपट करून सतत यशस्वी होत आहे आयुष्मान खुराणा

तुमच्या आत एक नि:शब्द ऊर्जा असते, जी तुमच्या ऊर्जेला सर्जनशीलतेत बदलते. अपयशानंतर त्यातून बाहेर पडणे खूप कठीण असते. पण संघर्ष कोणाशी करायचा आहे हे माहीत असेल तर आयुष्य सोपे होते. विचार करण्याची पद्धत सकारात्मक असेल तर तुम्ही कोेणत्याही दररोजच्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीपासून, गोष्टीने प्रेरित होऊ शकता. अशी व्यक्ती खूपच परिपूर्ण असण्याची आवश्यकता नाही. मला असे वाटते की, एखादा माणूस नऊ ते पाच अशी नोकरी करतो आणि तरीही उत्साहित असतो. तो सकाळी लवकर उठतो आणि आनंदी राहतो. तो जे काही करतो त्यामुळे तो आनंदी असतो, मग ते दररोजचे काम का असेना, तेही प्रेरणादायक असते. कलावंताचे आयुष्य खूप वेगळे असते. रोज नवे पात्र साकारावे लागते. कामाची निश्चित वेळ नसते, रविवार-सोमवार असे असत नाही. आमचे आयुष्य असेच रोमांचक असते. फक्त ते अशा पद्धतीने जगायला हवे. व्यक्तिगत बोलायचे झाले तर मी माझी कारकीर्दच जोखीम पत्करून साकारली आहे. लोक त्याला आव्हानात्मक आणि ऑफ बीट भूमिका म्हणतात. पण याच जोखमीमुळे मला माझा नव्याने शोध घेता येतो, त्यामुळेच मी इतरांपेक्षा वेगळा ठरतो आणि तोच माझा यूएसपी आहे. मी जोखीम घेणे बंद केले तर काहीही करू शकणार नाही असे मला वाटते. त्यामुळेच माझी प्रगती झाली आहे. मी पुढेही जोखीम घेत राहीन. जोखीम घेण्याची सवयच तुम्हाला नवीन गोष्टी करण्यास प्रेरित करते. त्यातूनच तुमची प्रगती होते. मी प्रत्येक दोन-तीन चित्रपटांनंतर ‘आर्टिकल १५’ किंवा ‘अंधाधुन’सारखे चित्रपट करू इच्छितो. आपण नव्याचा शोध फारच गांभीर्याने घेतो. आपल्यासाठी नवनवीन पात्रं साकार करणे हाही नव्याने शोध घेण्याप्रमाणेच आहे. बरेचदा चित्रपटाची कथा नवी नसते. ती एखाद्या जुन्या शहराचीच कथा असू शकते, पण मुद्दा दरवेळी वेगळा असावा. प्रेक्षकांना नवा मुद्दा हवा असतो. आम्ही कलावंत आहोत, स्वत:ला खूप गांभीर्याने घेतो. दरवेळी वेगळे दिसावे, असा आमचा प्रयत्न असतो. अर्थात, प्रेक्षकांसाठी आमचे वेगळे दिसणे गरजेचे नसते. त्यांना फक्त नवेपण आवडते आणि तुम्ही स्वत:ला नव्या प्रकारे सादर करत असाल तर चांगलेच आहे.  स्वत: कुठलीही भूमिका साकारताना अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जी भूमिका तुम्ही साकारत आहात तिचे अंतरंग जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्याबाबतची प्रत्येक गोष्ट माहीत असावी. त्या पात्राच्या आयुष्यात काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. दुसरा क्रमांक आहे भाषा आणि बॉडी लँग्वेजचा. जेथील पात्र तुम्ही साकारत आहात तेथील भाषा तुम्हाला चांगल्या प्रकारे यायला हवी. एवढेच नाही तर प्रत्येक पात्राची एक विशिष्ट बॉडी लँग्वेज असते, ती तुम्हाला त्याच्या जास्त जवळ नेते. म्हणजे कुठलेही काम करण्याआधी त्याबाबत लहानात लहान गोष्ट जाणून घेतली तर यश मिळण्याची संधी वाढते. तसेच कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना तुमच्या मनात स्पष्टता असणे आवश्यक आहे. तुम्ही स्वत:बाबत जेवढे स्पष्ट असाल, निर्णय घेणे तेवढेच सोपे असेल. गेल्या काही वर्षांत मी माझे विचार खूप स्पष्ट केले आहेत. त्यामुळे मी जेव्हा कुठलाही चित्रपट करतो तेव्हा तो करायचा हे आधीच ठरवतो. मला विषय किंवा कथा याबाबत कुठलीही दुविधा नसते. नव्याने शोध घेण्यात रोज इतर अनेक गोष्टींचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा विश्वास. मी दररोज जप करतो. त्यामुळे मला आंतरिक शक्ती मिळते. त्यामुळे माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे.  माझ्या आत एक नि:शब्द ऊर्जा असते, ती तुमच्या ऊर्जेला सकारात्मकतेत बदलते. मी आयुष्यात संघर्ष केला आहे. अर्थात, मी नेहमीच योद्धा राहिलो आहे. पहिला चित्रपट किंवा अयशस्वी चित्रपटांनंतर उभे राहणे कोणासाठीही खूप कठीण असते. पण संघर्ष कोणाशी करायचा आहे हे तुम्हाला माहीत असेल तर ते सोपे होते. तुमची विचार प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आयुष्यात लढणे खूप आवश्यक आहे. आयुष्यातील विजयाबाबत बोलायचे तर चित्रपट उद्योगात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासोबतच व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन साधणे हाच विजय आहे.

आयुष्मान खुराणा
अभिनेत

 

बातम्या आणखी आहेत...