आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाच्या सीमेवर लिंबू-मिरची नेऊन टाका... किस्साच खतम! खा. ओवेसींचे भाजपवर टीकास्त्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - देशाच्या सीमेवर लिंबू मिरचीचे ट्रक नेऊन टाका सर्व किस्सा खतम, अशा शब्दांत एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. 
एमआयएमचे उमेदवार फिरोज लाला यांच्या प्रचारार्थ बुधवारी रात्री देगलूर नाक्यावर खासदार ओवेसी यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याचा दाखला देत ओवेसी यांनी भाजपचा समाचार घेतला. आम्ही लिंबू पिळून त्याचे शरबत पितो. मिरची आम्ही खिम्यात टाकतो. लिंबू, मिरची आम्ही कोठेही ठेवत नाहीत, ती सरळ पोटात टाकतो अशा शब्दात त्यांनी राफेलच्या पूजेची टिंगल उडवली. आपल्या भाषणात ओवेसी यांनी काँग्रेसलाही टीकेचे लक्ष्य केले. २०१४ च्या निवडणुकीत ६ टक्के मुस्लिमांनी मोदींना मतदान केले तर ३७ टक्के हिंदूंनी मोदींना मत दिले. २०१९ मध्ये मोदींना मतदान करणाऱ्या मुस्लिमांची संख्या ६ टक्केच राहिली. परंतु हिंदू मतांची संख्या वाढून ३७ टक्क्यांवरून ४४ टक्क्यांपर्यंत गेली. काँग्रेसची व्होट बँक मोदींकडे वळली. यावर काँग्रेस काहीही बोलायला तयार नाही. काँग्रेस पार्टी आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे आॅफिस आता खंडर बनण्याच्या मार्गावर आहे. औरंगाबादला इम्तियाज जलील यांंना विजयी करून तेथील लोकांनी काँग्रेसकडून सुटका करून घेतली. आता या मतदार संघातही तुम्ही फिरोज लाला व साबेर चाऊस यांना विजयी करून सुटका करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...