Home | Maharashtra | Mumbai | Take the resignation of state chiefs in defeated states: Ashok Chavan's demand

पराभव झालेल्या राज्यांतील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे घ्या : अशोक चव्हाणांची मागणी

विशेष प्रतिनिधी | Update - May 26, 2019, 09:11 AM IST

वंचित बहुजन अाघाडीमुळे नुकसान झाले

  • Take the resignation of state chiefs in defeated states: Ashok Chavan's demand

    मुंबई - राज्यात काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे. देशात काँग्रेसच्या पराभवाला केवळ राहुल गांधींच जबाबदार नाहीत. हे टीम वर्क आहे. त्यामुळे त्या-त्या राज्यातील प्रदेशाध्यक्ष व प्रमुख नेतेसुद्धा जबाबदार आहेत. या सर्व प्रमुख नेत्यांनी व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले पाहिजेत. राहुल यांना पक्षात बदल करण्याची मोकळीक दिली पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केले.


    लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत. ते कुठेही कमी पडले नाहीत. राहुल आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा निश्चित यश मिळवू शकू, असेही चव्हाण यांनी नमूद केले.

    वंचित बहुजन आघाडीमुळे नुकसान झाले
    वंचित बहुजन आघाडीमुळे आघाडीचे नुकसान झाले. बहुतेक ठिकाणी त्यांनी लाखा-लाखाच्या वर मते घेतली. त्यामुळे आघाडीच्या ९ ते १० जागांवर परिणाम झाला. निवडणुकीपूर्वी आम्ही त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. पण ते आले नाहीत. त्याचा फटका बसला. वंचितने भाजपची बी टीम म्हणूनच काम केले आणि त्याचा फायदा भाजप-शिवसेनेला झाला, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

Trending