आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तख्त'साठी कलावंत शिकणार उर्दू; घेणार नमाजचे प्रशिक्षण, भव्य बजेटच्या चित्रपटासाठी करणची विशेष तयारी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क- करण जोहरच्या आगामी मोठ‌्या बजेटच्या तख्त चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनवर अजून पाच महिने काम चालणार आहे. यात चित्रपटातील पोशाख, सेट उभारणे आणि संवादाच्या प्रशिक्षणासाठी विशेष वेळ देण्यात येणार आहे. त्यामुळे हा करणचा सर्वात जास्त वेळ घेणारा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटासाठी कलाकार उर्दूचा वर्ग लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात उर्दूसाठी प्रशिक्षक नेमले जाणार आहेत. हे शिक्षक सर्वच कलाकार रणवीर सिंह, करिना कपूर, विकी कौशल, आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांना सर्वांनाच शिकवणार आहे. यापैकी काहींनी तर तयारीही सुरू केली आहे.
 

 

कलाकारांना दिल्या कडक सूचना 
करणने चित्रपटातील सर्वच कलाकारांना मुस्लिम समाजातील धार्मिक रीतिरिवाजांची बारीक सारीक माहिती घेण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. कलाकारांना मशिदीमध्ये जाऊन नमाज अदा करण्याची योग्य पद्धत शिकण्यास सांगितले आहे. शिवाय अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शिकण्यास सांगितले आहे. सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिल्यानंतर तो निश्चिंत होणार आहे.

 
जान्हवी कपूर
'करगिल गर्ल'चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर यावर काम करेल. 
अनुभव : कधीच साकारली नाही अशी भूमिका. त्यामुळे पूर्ण टीम तिच्यावर लक्ष ठेवेल. 

 

अनिल कपूर 
'मलंग' व 'बिंद्रा बायोपिक'मधून वेळ काढून यात काम करणार. 
अनुभव : आतापर्यंत जुन्या काळातील एकही पात्र साकारले नाही, मात्र कामात सर्वात अनुभवी.

 
करिना कपूर 
'इंग्लिश मीडियम'चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर याची कथा वाचणार. 
अनुभव : तिच्या सासरी असेच वातावरण आहे. शिवाय याआधी तिने अशा भूमिका साकारल्या आहेत. 


आलिया भट्ट 
'ब्रह्मास्त्र'मधून मिळालेल्या ब्रेकनंतर वर्कशॉपला हजेरी लावत आहे. 
अनुभव : पात्र आत्मसात करण्यात पारंगत. 'कलंक' मध्ये जुन्या काळाची भूमिका साकारली आहे. करण तिच्या कामाने खुश आहे. 

 

रणवीर सिंह 
लंडनमध्ये '83' चे शूटिंग पूर्ण करून परतल्यानंतर या चित्रपटाच्या तयारीत लागणार आहे. 
अनुभव : 'पद्मावत'मध्ये खिलजीचे पात्र साकारून प्रशंसा मिळवली होती. त्या काळातील पात्र साकारण्यात मदत होईल. 


भूमी पेडणेकर 
'पति पत्नी और वो'च्या शूटिंगमध्येच तयारी करणार. 
अनुभव : अशा प्रकारच्या भूमिका केल्या नाहीत, मात्र भाषेवर वर्चस्व आहे. 

 

विकी कौशल 
'ऊधम सिंह'च्या पुढचा भाग सुरू करण्याआधी याचे काम पूर्ण करणार. 
अनुभव : विकी, नसिरुद्दीन शाहच्या येथे नाटकाचे प्रशिक्षण घेतले आहे. मात्र, अजून ऐतिहासिक भूमिका केली नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...