आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसाठी खेळणी घेताय...?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुरिमा टीम

मुलांसाठी खेळणी घेताय...? जरा थांबा आणि भारतीय गुणवत्ता परिषदेचा हा अहवाल वाचा...


भारतात आयात होणारी ७० टक्के खेळणी मुलांसाठी धोकादायक असल्याचं भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (QCI) अहवालात म्हटलं आहे. भारतातली अनेक खेळणी मेकॅनिकल, केमिकल आणि इतर अनेक प्रकारच्या चाचणीत अपात्र ठरल्याचं QCI ने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळलं आहे. QCI च्या अहवालानुसार या खेळण्यांमध्ये केमिकलचं प्रमाण अधिक होतं. या केमिकलमुळे मुलांना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. मात्र, अनेकांना याची विशेष माहिती नसते. 

मुलांच्या खेळण्यावर टॉक्सिक (विषारी) आणि नॉन टॉक्सिक लिहिलेलं असतं. मात्र खेळणी विकत घेताना हे तपासलं जातंच असं नाही. सर्वसामान्यपणे जे खेळणं आवडतं ते विकत घेण्याकडे लोकांचा कल असतो. खेळण्याची किंमत आणि कसं वापरायचं, याव्यतिरिक्त ते फारसे प्रश्न विचारत नाही. QCI चे सेक्रेटरी जनरल डॉ. आर. पी. सिंह सांगतात, "भारतात आयात होणाऱ्या खेळण्यांची चाचणी एका सॅम्पलच्या आधारावर होते आणि या खेळण्यांना एक्सपायरी डेट नाही. त्यामुळे त्या टेस्ट रिपोर्टसोबत येणाऱ्या खेळण्यांच्या मालाची चाचणी झाली आहे की नाही हे कळत नव्हतं. QCI ने गुणवत्ता चाचणीसाठी खेळणी आणली. मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत खेळण्यांची चाचणी करण्यात आली. वेगवेगळ्या श्रेणीतील १२१ खेळण्यांची चाचणी करण्यात आली. ज्यात प्लास्टिकपासून तयार केलेली खेळणी,सॉफ्ट टॉय/स्टफ्ड टॉय, लाकडाची खेळणी, मेटलची खेळणी, इलेक्ट्रिक खेळणी, मुलं आत जाऊ शकतील अशी खेळणी (उदा. टॉय टेंट)यांचा समावेश होता.

गुणवत्ता चाचणीत खेळण्यांमध्ये घातक केमिकलचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलं. त्यात 41.3% खेळण्यांचे नमुने मेकॅनिकल चाचणीत फेल, 3.3% खेळण्यांचे नमुने केमिकल चाचणीत फेल, 12.4% खेळण्यांचे नमुने मेकॅनिकल आणि केमिकल चाचणीत फेल, 7.4% खेळण्यांचे नमुने ज्वलनशीलता चाचणीत फेल, 2.5% खेळण्यांचे नमुने मेकॅनिकल आणि ज्वलनशीलता चाचणीत फेल असे निष्कर्ष निघाले. अशा घातक खेळण्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी सांगताना डॉ. आर. पी. सिंह यांनी म्हटलं, " सॉफ्ट टॉइजमध्ये थॅलेट नावाचं रसायन असतं. या रसायनामुळे कॅन्सर होण्याचाही धोका असतो. या खेळण्यांमधून निघणाऱ्या धाग्यांमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम व्हायला नको. खेळण्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे त्वचाविकार होऊ शकतात. तोंडात टाकल्यास इन्फेक्शन होऊ शकतं. 

(सौजन्य - बीबीसी)

बातम्या आणखी आहेत...