Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | talathi recruitment 2019 in marathwada

मराठवाड्यातील जिल्ह्यांत 337 तलाठ्यांची भरती

प्रतिनिधी | Update - Mar 08, 2019, 12:52 PM IST

राज्यातील एकूण १५४३ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करता येतील.

  • talathi recruitment 2019 in marathwada

    औरंगाबाद - मराठवाड्यात औरंगाबादसह आठ जिल्ह्यांमध्ये तलाठ्याच्या ३३७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एसईबीसीतील उमेदवारांना नियुक्तिपत्र न देण्याचे शासनाचे आदेश असल्याने या प्रवर्गाबाबत संभ्रम आहे. राज्यातील एकूण १५४३ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करता येतील.


    केंद्राचे आर्थिकदृष्ट्या मागासांना व राज्य शासनाने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणानुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शासनाच्या महापरीक्षा संकेत स्थळावर जाहिरात आणि अर्ज करता येतील.


    अशा आहेत जागा : औरंगाबाद जिल्ह्यात ५६, जालना २७, बीड ६६, लातूर २९, नांदेड ६२, परभणी २७, उस्मानाबाद ४५ तर हिंगोली जिल्ह्यात २५ जागा आहेत.

Trending