आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळेगाव : 25 वर्षीय तरुणाचा शस्त्राने वार करून खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - तळेगाव एमआयडीसीजवळील रस्त्याच्या कडेला एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळला. मृतदेहाची अद्याप आेळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केल्याचे दिसत आल्याने पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. 


तळेगाव दाभाडे शहराजवळील इंदाेरी ते जांभाेळे गावादरम्यान रस्त्याच्या बाजूला अज्ञात तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मंगळवारी एमआयडीसी पाेलिसांना मिळाली. त्यानुसार पाेलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असता संबंधित तरुणाच्या डाेक्यावर व पाेटावर शस्त्राने गंभीर वार केल्याचे निदर्शनास आले. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात पाठवला. दरम्यान, तरुणाच्या हत्येचे कारण समजू शकले नाही.  


पोेलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून या माध्यमातून मारेकऱ्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.