आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारपणामुळे खंगलेत कादर खान, जाणून घ्या आता कुठे आणि काय करताहेत हे 15 फेमस अॅक्टर-अॅक्ट्रेसेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडला स्वप्नांचे जग म्हटले जाते. प्रत्येक जण काही स्वप्न उराशी बाळगून या मायानगरीत प्रवेश करत असतो. इतकेच नाही तर येथे एखादी व्यक्ती प्रसिद्ध झाल्यानंतर इतर जण त्याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. हा क्रम गेल्या अनेक वर्षांपासून येथे सुरु आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी यशोशिखर गाठले, प्रेक्षकांचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले, मात्र हळूहळू हे सेलिब्रिटी येथून जणू अज्ञातवासात निघून गेले. त्यानंतर त्यांनी एका विशिष्ट वर्तुळापुरतेच आपले आयुष्य मर्यादित ठेवले. 


या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेता आणि अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी बॉलिवूडमध्ये यशाची चव चाखली आणि आता मात्र इंडस्ट्रीत ते फारसे अॅक्टिव नाहीत. आता कुठे आहेत हे सेलिब्रिटी आणि काय करताहेत जाणून घ्या..


कादर खान
ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्याशिवाय नव्वदच्या दशकातील सिनेमांची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. त्याकाळात कादर खान यांनी अनेक सिनेमांमध्ये श्रीमंत वडिलांची भूमिका वठवली. कादर खान हे 'हो गया दिमाग का दही' या सिनेमात शेवटचे दिसले.  


आता कुठे आहेत...
काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेले ज्येष्ठ अभिनेते कादर खान आता आजारपणामुळे खंगले असून, त्यांना बोलतानाही त्रास होत असल्याचे म्हटले जाते. कादर खान यांच्या सुनेने यासंबंधीची माहिती काही महिन्यांपूर्वी एका वेबसाइटला दिली होती. खान यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती देत सून शाहिस्ता खान म्हणाल्या,‘त्यांना बोलताना खूपच त्रास होत आहे. ते काय बोलतात हे फक्त मी आणि माझे पतीच समजू शकतो. बोलण्यात अडथळा येत असला तरीही त्यांची स्मृती चांगली असून, ते सर्वांना ओळखत आहेत.’  काही वर्षांपूर्वी कादर खान यांच्या गुडघ्यावर चुकीची शस्त्रक्रिया झाल्याचं म्हटलं जात होतं. पण, तसं काहीच नसून, शस्त्रक्रिया अगदी व्यवस्थित पार पडली होती असं त्यांचा मुलगा सरफराजने स्पष्ट केलं होतं. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार खान यांनी हालचाल करण्यास नकार दिल्यामुळेच त्यांना हा त्रास झाल्याचंही त्याने स्पष्ट केलं. आपल्या वडिलांची प्रकृती स्थिर असून, ते माझ्या कुटुंबासमवेत सुखी आयुष्य जगत आहेत, असंही सरफराजने सांगितले होते. 


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या 90च्या दशकातील अशाच आणखी काही सेलिब्रिटींविषयी... 

बातम्या आणखी आहेत...