आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी कैद्यांची १४ मार्चपासून सुटका; राष्ट्रपती गणी यांचे आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारागृहात नमाज अदा करणाऱ्या तालिबानी कैद्यांचे संग्रहित छायाचित्र. - Divya Marathi
कारागृहात नमाज अदा करणाऱ्या तालिबानी कैद्यांचे संग्रहित छायाचित्र.
  • सरकार-तालिबानमध्ये शांतता कराराची अंमलबजावणी
  • अमेरिकेचे लष्कर १४ महिन्यांत अफगाणिस्तान सोडणार
  • अनेकांच्या मनात शंका, महिलांवर पुन्हा बंधने लादली जाण्याची भीती

काबूल - अफगाणिस्तानात सरकार आणि तालिबान यांच्यात झालेल्या शांतता करारानुसार तालिबानच्या कैद्यांची १४ मार्चपासून सुटका करण्यास सुरुवात होणार आहे. याबाबतचे आदेश अफगाणिस्तानचे राष्ट्रपती माेहम्मद अशरफ गणी यांनी दिले आहेत. पहिल्या टप्प्यात दीड हजार कैद्यांना पॅरोलवर सोडले जाणार आहे.एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, राष्ट्रपतींच्या आदेशानुसार ५ हजार तालिबानी कैद्यांची टप्प्याटप्प्याने सुटका केली जाणार आहे.  उर्वरित साडेतीन हजार तालिबानी कैद्यांची सुटका इंट्रा-अफगाण चर्चेनंतर केली जाणार आहे. करारानुसार सुटका होणाऱ्या कैद्यांना लिहून द्यावे लागणार आहे की, त्यांची सुटका झाल्यानंतर ते युद्धभूमीवर परतणार नाहीत. राष्ट्रपतींचे मुख्य प्रवक्ते सेदिक सेदिक्की यांनी याबाबत ट्विट केले असून त्या ट्विटमध्ये सेदिक्की यांनी म्हटले आहे की, सरकार पहिल्या पंधरा दिवसांत दीड हजार तालिबानी कैद्यांची सुटका करेल. दररोज तालिबानी कैद्यांना वय, आरोग्याची स्थिती आणि उर्वरित शिक्षेच्या आधारावर या कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. या कैद्यांना बायोमेट्रिक नोंदणी करावी लागणार आहे.अमेरिकेचे लष्कर १४ महिन्यांत अफगाणिस्तान सोडणार

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, तालिबानने अमेरिकेला ५ हजार कैद्यांची यादी दिली आहे. यात कोणताही बदल केला जाऊ शकणार नाही. अमेरिका आणि तालिबान यांच्यात कतारमध्ये २९ फेब्रुवारी रोजी शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, तर अफगाणिस्तान आणि अमेरिकेनेही त्याच दिवशी संयुक्त घोषणा केली होती. करारानुसार अमेरिका आणि मित्र देशांचे लष्कर १४ महिन्यांच्या आत अफगाणिस्तानातून निघून जाणार.अनेकांच्या मनात शंका, महिलांवर पुन्हा बंधने लादली जाण्याची भीती

करारानंतर अफगाणी नागरिकांना भीती आहे की, अमेरिकेने त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून दिले आहे. तालिबानच्या कैद्यांची सुटका होईपर्यंत अफगाण सरकारविरोधात संघर्ष सुरू राहण्याचे संकेत आहेत. यात अमेरिका कोणतेही हस्तक्षेप करणार नसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालिबान शासन असताना २००१ मध्ये काय झाले होते हे लोक जाणून आहेत. विशेषत: महिलांच्या अधिकारांवर गदा येईल. तालिबान मुलींना शाळेत जाऊ देत नाही, कामावर जाऊ देत नाहीत.बातम्या आणखी आहेत...