आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानने केली साथीदारांच्या बदल्यात ३ भारतीयांची सुटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अफगाणिस्तानमधील तालिबानने ११ साथीदारांच्या बदल्यात तीन आेलिस भारतीयांची एक वर्षांनंतर सुटका केली. सोमवारी याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली.  ६ ऑक्टोबरला तालिबान्यांनी ११ साथीदाऱ्यांच्या मोबदल्यात ३ भारतीय अभियंत्यांची अज्ञात ठिकाणी सुटका करण्यात आल्याचा दावा केला आहे.  भारतीयांची सुटका करण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि तालिबानींमध्ये चर्चा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीयांच्या मोबदल्यात शेख अब्दुल रहीम आणि मौलाना अब्दुर रशीद यांच्यासह अन्य तालिबान्यांची सुटका भारताने केली. हे दोघेही २० वर्षांपूर्वीच्या तालिबानी सरकारमध्ये कुनार आणि निमरोज प्रांताचे राज्यपाल राहिलेले आहेत. याप्रकरणी अद्यापही अफगाणिस्तान सरकारने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.दुसरीकडे,अफगाणिस्तान सरकारसोबत चर्चा सुरू असून, सुटकेची माहिती त्यांच्या माध्यमातूनच मिळाली असल्याचे भारत सरकारच्या सूत्रांनी म्हटले आहे. तीन भारतीय अभियंत्यांची आेळख मात्र स्पष्ट होऊ शकलेली नाही. सरकार त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न करत आहे. 

टखर प्रांतातील २ जिल्ह्यांची तालिबान्यांपासून सुटका 
अफगाणिस्ताच्या पूर्वेकडील टखर प्रांतातील ख्वाजा आणि बहरक या दोन जिल्ह्यांची तालिबानींच्या ताब्यातून सुटका करण्यात आली आहे. टखर प्रांतात अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू होता, परंतु आता इथे सरकारचे नियंत्रण असल्याचे सरकारचे प्रवक्ते जवाद हाजरी यांनी सांगितले आहे. 
 

अफगाणिस्तानात १८ दहशतवादी ठार, ३ जवानांचा मृत्यू
अफगाणिस्तानातील कुंदुज भागात सैन्यात आणि तालिबान्यांमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले असून, १८ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेले आहे. दहशतवाद्यांनी कलाय-ए-जल जिल्ह्यात रविवारी रात्री हल्ला केला. त्यांनी सरकारी इमारती आणि मुख्यालयांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी हा हल्ला परतवून लावल्याची माहिती गृह मंत्रालयाने सोमवारी दिली. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एका स्थानिक तालिबानी नेत्याचा समावेश आहे.