Home | International | Other Country | taliban terror group leader mulla omar kidnaped

तालिबानी नेता मुल्ला उमर बेपत्ता, 'आयएसआय़'च्या ताब्यात

Agency | Update - May 24, 2011, 10:37 AM IST

तालिबानी नेता मुल्ला मोहम्मद उमर याच्या मृत्युची अद्याप अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही. अफगणिस्तान सरकारने दावा केला आहे की, मुल्ला उमर याला दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय़'ते अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

  • taliban terror group leader mulla omar kidnaped

    omar_256काबुल - तालिबानी नेता मुल्ला मोहम्मद उमर याच्या मृत्युची अद्याप अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही. अफगणिस्तान सरकारने दावा केला आहे की, मुल्ला उमर याला दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय़'ते अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. उमर याला या अधिकाऱ्यांनी अज्ञात ठिकाणी नेले असून, तो जिंवत आहे की मेला याबाबत कोणतीही माहिती नाही.

    अफगणिस्तानच्या नॅशनल डायरेक्ट्रेट ऑफ सेक्युरिटीचे (एनडीएस) प्रवक्ता लुतफुल्ला मसान यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर याला आयएसआय़चे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची पक्की माहिती आम्हाला मिळाली आहे. आय़एसआयच्या या अधिकाऱ्यांचे नेतृत्व माजी प्रमुख जनरल हमीद गुल हे करीत होते. तालिबानी नेत्यांनी उमर यांना कोणत्या कारणामुळे ताब्यात घेण्यात येत आहे, असे हमीद यांना विचारले असता त्यांनी सुरक्षेच्या कारणामुळे उमर ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्यानंतर उमर याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. सोमवारी एका अफगणिस्तानमधील वृत्त वाहिनीने मुल्ला ओमरला पाकिस्तानमध्ये ठार मारण्यात आल्याचे वृत्त दिले होते.
    तालिबानी नेता मुल्ला उमर पाकिस्तानमध्ये ठार    तालिबानी दहशतवाद्यांचा पाकिस्तानमध्ये वायुसेनेच्या तळावर हल्ला; 10 ठारTrending