तालिबानी दहशतवाद्यांचा पाकिस्तानमध्ये वायुसेनेच्या तळावर हल्ला; 10 ठार

Agency

May 23,2011 09:52:17 AM IST

कराची - अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्या हत्येचा बदला घेण्यास तालिबानकडून सुरवात झाली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी कराचीतील पाकिस्तानी वायुसेनेच्या तळावर हल्ला करून 10 नागरिकांना ठार मारले. तर या हल्ल्यात पाच दहशतवादी सुद्धा ठार झाले आहेत.

दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु असून, शहराह-ए-फैसल या वायुसेनेच्या तळावर आणखी नागरिक अडकले आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी विदेशी नागरिकांनाही ओलिस ठेवले आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात अमेरिकेकडून पाकिस्तानने घेतलेली दोन पीसी-3 विमाने नष्ट झाली आहेत. या विमानांवर दहशतवाद्यांनी रॉकेटने हल्ले केले आहेत. या हल्ल्यामुळे पूर्ण पाकिस्तानमध्ये अलर्ट घोषित करण्यात आला असून, सात स्फोटांचे आवाज ऐकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने उचलली आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या तळाला 150 पाकिस्तानी जवानांनी घेरले आहे.

बदल्याच्या इराद्याने पाकिस्तानजवळ १६ लोकांना जिवंत जाळले

शत्रूच्या प्रदेशात जाऊन कारवाईस भारतही सज्ज

X
COMMENT