Home | International | Pakistan | taliban terrorist warned pakistan

पाकिस्तानच्या अणुबॉम्बचा ताबा घेण्याची तालिबानची धमकी

Agency | Update - May 26, 2011, 07:43 PM IST

तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानमधील अणुबॉम्बवर ताबा घेण्याची धमकी दिली आहे.

  • taliban terrorist warned pakistan

    इस्लामाबाद - तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानमधील अणुबॉम्बवर ताबा घेण्याची धमकी दिली आहे.

    अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र 'द वॉल स्ट्रिट जनरल' ने तालिबानच्या प्रवक्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तालिबानची पाकिस्तानच्या अणुभट्टांवर हल्ला करण्याची कोणतीही योजना नसून, पाकिस्तानच्या पूर्ण अणु हत्यारे ताब्यात घेण्याची योजना आहे. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या संबंधांतील वृत्तपत्र असलेल्या द नेशन या वृत्तपत्राने ही माहिती जाहिर केली आहे. कराचीतील वायुदलाच्या तळावर केलेला हल्ला तालिबानने केला असल्याची अफवा अमेरिकेकडून देण्यात येत असल्याची माहिती ऐहसानुल्ल एहसान याने दिली आहे. पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू अमेरिका असून, पाकिस्तानला तालिबानीविरुद्ध भडकावत असल्याचे त्याने म्हटले आहे. पाकिस्तान अणुबॉम्ब असलेला एकमेव मुस्लिम देश आहे.त्यामुळे पाकिस्तानमधील अणुबॉम्ब नष्ट करण्याचा आमचा इरादा नसून, ते ताब्यात घेण्याचे आहेत.

Trending