Home | International | Other Country | talibani leader mulla omar shot dead in pakistan

तालिबानी नेता मुल्ला उमर पाकिस्तानमध्ये ठार

Agency | Update - May 23, 2011, 12:23 PM IST

अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला ठार मारल्यानंतर आता तालिबानी नेता मुल्ला मोहम्मद उमर याला पाकिस्तानमध्ये ठार मारण्यात आल्याचे वृत्त आहे.

  • talibani leader mulla omar shot dead in pakistan

    umar_256काबुल - अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला ठार मारल्यानंतर आता तालिबानी नेता मुल्ला मोहम्मद उमर याला पाकिस्तानमध्ये ठार मारण्यात आल्याचे वृत्त आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटा येथून वजिरीस्तान येथे जात असताना त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. मात्र, तालिबानी संघटनेने या वृत्ताचे खंडन केले आहे. अमेरिकेने रविवारी ओसामा सारखे इतर दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये घुसून ठार मारणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच अमेरिकेचे लादेननंतर पुढील लक्ष्य उमरचा होता. उमरला कसे ठार मारण्यात आले याची अद्याप कोणतीही सविस्तर माहिती हाती लागली नसून, एका सुरक्षा अधिकाऱ्याने तो ठार झाल्याचे सांगितले आहे. अफगणिस्तानमधील वृत्तपत्रांनी ओमरची दोन दिवसांपूर्वीच उमरची हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानमधील कोणत्याही माध्यमांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

    तालिबानी दहशतवाद्यांचा पाकिस्तानमध्ये वायुसेनेच्या तळावर हल्ला; 13 ठार

    बदल्याच्या इराद्याने पाकिस्तानजवळ १६ लोकांना जिवंत जाळलेTrending