आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Talking About The Movie 'hacked', Heena Khan Said 'Due To Some Fans We Celebrities Have To Suffer A Trouble'

'हॅक्ड' चित्रपटाबद्दल बोलत असताना हिना खान म्हणाली - 'काही चाहत्यांमुळे आम्हा सेलिब्रिटींना त्रास सहन करावा लागतो'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : हिना खान सध्या विक्रम भट्‌ट दिग्दर्शित गूढ रहस्यपट 'हॅक्ड'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. हिना यात खूपच ग्लॅमरस शैलीत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एका खास मुलाखतीत 'हॅक्ड'च्या कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत झालेली बातचीत...,

विक्रम भट्‌टला प्रश्न : चित्रपटात हिना आणि रोहन यांनाच काय घेतले ?

हिना एक चांगली अभिनेत्री आहे. तिला फॅशनची आवड आहे, असे मला वाटते. ती रोज काही ना काही प्रयोग करत असते. पात्रासाठी मला तीच परफेक्ट वाटली. रोहनचे मी कधीच ऑडिशन घेतले नाही. तो जेव्हा माझ्या समोर अाला तेव्हाच मला वाटले की, हाच त्या पात्रासाठी योग्य आहे.

हिना खानला प्रश्न : सुनेची प्रतिमा सोडून इतकी बोल्ड भूमिका का केली ?

मला काहीतरी वेगळे करायचे होते. चांगल्यात चांगला करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. चित्रपटात मी हा प्रयत्न केला आहे. समीरा खन्नाच्या पात्राचे जे कपडे आहेत ते प्रत्येक दृश्यात चांगले आहेत, तिचे ड्रेसिंग सेंस कारपोरेट स्टाइलचे आहे.

रोहन शाहाला प्रश्न : हिना खान आणि विक्रम भट्टसोबत काम करणे सोपे गेले की अवघड ?

मला दोघांसोबत काम करायला खरोखर आनंद झाला. विक्रम भट्टसारखे प्रतिभावंत दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडले आणि सोपेही गेले. त्यांना काय गरजेचे आहे काय नाही, हे सर्व माहित असते.

हिना आणि विक्रमला प्रश्न : तुमचे सोशल मीडिया अकाउंट कधी हॅक झाले का ?

हिना : दर दोन ते तीन दिवसाने माझे सोशल मीडिया अकाउंटल हॅक करण्याचा प्रयत्न होत असतो. माझ्या अकाउंट्सवर माझा पर्सनल नंबर आहे. मात्र अजून तो कुणाच्या हाती लागला नाही. मात्र अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न होतो.

विक्रम भट्ट : माझ्या नावाची फेक आयडी बनवण्यात आली होती. त्याच्यावर माझा फोटोदेखील होता. त्यावरुन तो व्यक्ती लोकांना चित्रपटात घेण्याचे सांगत फसवणूक करत होता. एक प्रकरण मला आठवतेय, एका मुलीने माझ्या टीमला फोन करून संागितले, एक माणूस मला तुमच्या चित्रपटाची आॅफर देत आहे, आणि त्योन दोन लाख रुपये मागितले आहेत. नंतर मला कळाले की, माझ्या फेसबुकवर 3400 फॉलोअर्स आहेत आणि त्याचे 5600 फॉलोअर्स होते.

हिना, रोहन आणि विक्रमला प्रश्न : चाहत्यांचा कधी त्रास झाला का ?

हिना : मला अनेकदा चाहत्यांचे फोन येतात. काही चाहते वेड्यासारखे करतात. त्यामुळे त्यांना ब्लॉक करते. अशा 'जबरा फॅन'मुळे अनेकदा आम्हा सेलिब्रिटींना त्रास सहन करावा लागतो.

रोहन : मीदेखील अनेक लोकांना ब्लॉक केले आहे. कारण, दुसरा मार्गच नसतो. नुकताच मी एका मुलीला भेटलो. तिने मला सांगितले, मी कोलकात्यात कोणत्या तारखेला, किती वाजता, कोणत्या दुकानात रसगुल्ला खाल्ला हाेता. हे सर्व इंस्टाग्रामवर स्टेटस चेक करूनदेखील केले जाते.

विक्रम : गूगलवरुन तुमच्याविषयी माहिती काढली जाऊ शकते. काही अॅप स्टॉकिंगचे काम करतात. ते इंस्टॉल करताच सर्व माहिती कळते. कधी-कधी मलादेखील त्रास होत असतो.