आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Talks About Ajit Pawar's Use Of Pressure To Get Son Parth To Run For The Legislative Assembly

आता बारामती नेमकी कुणाची? मुलगा पार्थला विधानसभेलाही उमेदवारी मिळण्यासाठी अजितदादांनी दबावतंत्र वापरल्याची चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषदेत कंठ दाटून आल्यानंतर अजित पवार पाणी पिऊन शांत झाले. - Divya Marathi
पत्रकार परिषदेत कंठ दाटून आल्यानंतर अजित पवार पाणी पिऊन शांत झाले.

दीप्ती राऊत 

पुणे - ज्या बारामतीच्या मातीत शरद पवार यांचे राजकारण फुलले त्याच बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार काेण, हा येत्या आठवडाभरातील निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी कसोटीचा ठरणार आहे. अजित पवार यांच्या राजीनामानाट्यानंतर पवार कुटुंबातील गृहकलह आणि राष्ट्रवादीमधील नेतृत्वाचा संघर्ष या निवडणुकीत महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. अजितदादांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे बाहेरून कळल्यावरही पूरग्रस्तांच्या भेटीचा नियोजित कार्यक्रम पूर्ण करणारे आणि या अवघडप्रसंगी अत्यंत संयतपणे माध्यमांना समोरे जाणारे शरद पवार बारामतीतून कोणाला उमेदवारी देणार, यावर पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भवितव्याची दिशा ठरणार आहे.

अजित पवारांचे ना’राजीनामा’नाट्य महाराष्ट्राला नवीन नाही. याआधीही आघाडी सरकारच्या काळात आर. आर. पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद दिले आणि जयंत पाटील यांच्याकडे अर्थ आणि नियोजन हे महत्त्वाचे खाते सोपवले तेव्हाही अजित पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली हाेती. “दादा महाराष्ट्रात आणि मी दिल्लीत’ अशी सारवासारव करण्यात येत असली तरी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील ‘ताई विरुद्ध दादा’ हे शीतयुद्धही महाराष्ट्रात लपून राहिलेले नाही. त्यातच पाटबंधारे खात्याचे मंत्री असताना धरणातील पाण्याबद्दल अत्यंत असंवेदनशील विधान केल्यानंतर अडचणीत आलेल्या अजित पवार यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्या वेळी माध्यमांना टाळणारे शरद पवार या वेळी अत्यंत संयतपणे माध्यमांना सामोरे गेले. ‘माझ्यावरील ईडीच्या कारवाईमुळेच अजित पवार उद्विग्न’ अशी भूमिका घेतल्याने अजित पवारांची अधिकच कोंडी झाली.

लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थच्या उमेदवारीसाठी पवारांना माढ्यातून माघार घ्यावी लागली. त्या वेळी प्रथमच जाहीरपणे पवारांना पाठिंबा देण्यासाठी राेहित पवार पुढे आले. या कौटुंबिक कलहात शांत राहिलेल्या सुप्रिया सुळे आणि सांगली-कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीच्या दाैऱ्यापासून सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या झंझावातात शरद पवार आणि रोहित पवार यांच्यातील वाढलेली जवळीक, या घडामाेडी अजितदादांच्या नाराजीचा टप्पा स्पष्ट करण्यासाठी पुरेशी बोलकी होती. 
 

दबावाला बळी पडणार नाहीत शरद पवार
बारामतीमधून आता पार्थला उमेदवारी देण्याचा हट्ट पुरवण्यासाठी अजित पवारांनी राजीनाम्यातून दबावाचा प्रयत्न चालवला असेल तर शरद पवार  लाेकसभेप्रमाणे त्याला बळी पडणार नाहीत. पुण्यातील पत्रकार परिषदेतील त्यांची देहबाेली हेच सांगत हाेेती. आता या वेळच्या राजीनाम्यामुळे अजित पवारांबद्दल पक्षात जी काही सहानुभूती उरली हाेती तीही शरद पवारांच्या पारड्यात पडत आहे. भाजपच्या ईडी कारवाईचा ससेमिरा शरद पवारांनी ज्या मुत्सद्देगिरीने हाताळला त्यावर अजित पवारांनी ‘राजीनाम्या’तून पाणी फेरल्याची भावनाही कार्यकर्त्यांत आहे.
 

राेहितची वाढली जवळीक
प्रतिष्ठेचा मुद्दा करूनही अजितदादा लाेकसभेत पार्थला निवडून आणू शकले नाहीत, आणि रोहित पवार जिल्हा परिषदेत निवडून येऊन, ‘सृजन’ च्या माध्यमातून युवकांचे समांतर संघटन बांधून दीड-दाेन वर्षातच थेट विधानसभेच्या मैदानात उतरले. जामखेडमध्ये त्यांचा सामना मंत्री राम शिंदेंशी असल्याने स्वत: शरद पवारांनी राेहितसाठी या मतदारसंघात दाेन दाैरे केले. त्यातच अजितदादांनी एेन निवडणुकीच्या ताेंडावर शरद पवारांना एकाकी पाडले, या काळात राेहित हा त्यांच्यासाेबत असणे हा महत्त्वाचा संकेत मानला जाताे.

बातम्या आणखी आहेत...