आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांततेच्या नोबेलसाठी नरेंद्र मोदींचे नामांकन, \'आयुष्मान भारत\' चा दाखला देत तमिळनाडू भाजप अध्यक्षांनी भरला अर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव 2019 च्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. हे नामांकन भरले आहे, तमिलनाडू भाजपच्या अध्यक्ष डॉ. तमिलसाई सौंदराजन यांनी. यासाठी त्यांनी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून गाजावाजा झालेल्या 'आयुष्मान भारत' योजनेचा दाखला दिला आहे. 


भाजपाध्यक्षांच्या पतीनेही केले नॉमिनेट 
>> तमिळसाई यांचे पति डॉ. पी. सौंदराजन यांनीही पंतप्रधानांना या पुरस्कारासाठी नॉमिनेट केले आहे. डॉ. पी. सौंदराजन नेफ्रोलॉजीचे ज्येष्ठ सल्लागार आणि राज्याच्या खासगी विद्यापीठातील नेफ्रोलॉजी विभागाचे अद्यक्ष आहेत. 
>> सौंदराजन म्हणाले की, पीएम मोदी यांच्याकडे दूरदृष्टी आहे. त्यांनी कोट्यवधी लोकांच्या भल्यासाठी ही योजना लागू केली आहे. देशातील गरीबी पाहता ही आरोग्य योजना अत्यंत उपयोगी असल्याचेही ते म्हणाले. 
>> तमिलसाई यांनी देश-विदेशातील सर्व हेल्थकेअर प्रोव्हाइडर्स आणि नागरिकांना नोबेल शांतता पुरस्कार 2019 साठी मोदींना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. 


असा मिळतो नोबेल 
>> नोबेल शांतता पुरस्काराच्या नामांकनासाठी अंतिम तारीख 31 जानेवारी 2019 आहे. त्याची प्रक्रिया दरवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होते. पहिल्या टप्प्यात जनतेकडून नामांकने मागवली जातात. त्यातून जी नावे येतात त्यावर तज्ज्ञ विचार करतात. 
>> नामांकित लोकांची वैशिष्ट्ये त्यांचे संशोधन त्यांचे काम यावर चर्चा होते. संबंधित देशाचे सरकार, माजी नोबेल विजेते, प्राध्यापक यांची मते मागवली जातात. ही प्रक्रिया वर्षभर चालते. 
>> एखाद्या व्यक्तीचे नाव मृत्यूनंतर नोबेलसाठी देता येत नाही. पण नामांकन झाल्यानंतर मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीला नोबेल दिला जातो. आतापर्यंत दोनवेळा असे झाले आहे. 
>> जर एखाद्या श्रेणीमध्ये दोघांना संयुक्तपणे पुरस्कार मिळाला तर पुरस्काराची रक्कम दोन भागांत विभागली जाते. तीन विजेते असतील तर, अर्धी रक्कम प्रथम विजेत्याला आणि इतर दोन विजेत्यांनी उर्वरित रक्कम अर्धी अर्धी दिली जाते. 

 

बातम्या आणखी आहेत...