आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मदुरै- तमिळनाडुच्या कन्याकुमारीमध्ये सब इंस्पेक्टर मोहन अय्यरच्या शौर्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भाजपाचे आंदोलक केरळ स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन (केएसआरटीसी)च्या बसवर हल्ला करत होते. पण सब इंस्पेक्टर मोहन यांनी त्यांचा पाटलाग करून त्यांना पळवून लावले. त्यांनी त्या जमावाला कोणत्याही पब्लीक प्रॉपर्टीला हात न लावण्याची धमकी देत, कोणत्याही प्रकराचे नुकसान करण्यासापसून त्यांना रोखले. जमावाला वॉर्नींग देतानाचा त्यांचा एक व्हिडीओ खुप व्हायरल होत आहे. केरळच्या सबरीमाला मंदीरात दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे हे आंदोलन होत आहे.
आदोंलनकर्त्यांना एसआयने काय म्हटले?
- एसआय मोहन यांनी बुधवारी संध्याकाळी केरळच्या बसबर हल्ला करण्यासाठी जात असलेल्या आंदोनकर्त्यांना सांगितले की, ''जर तुम्ही मनुष्य आहात तर बसला हात लावायची हिम्मत नाही करणार. कोणत्याही नागरिकावर आणि पब्लिक प्रॉपर्टीचे नुकसान सहन नाही केले जाणार. मला यासाठी ट्रांसफर व्हावे लागले तरी हरकत नाही.''
यामुळे होते आहे आंदोलन
- मीडिया रिपोर्ट्सनुसा, सबरीमाला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे केरळ बंदची हाक पुकारण्यात आली होती.
- या दरम्यान 100 ते 150 भाजपा कार्यकर्ते कन्याकुमारीच्या केलियाक्काविलाईमध्ये संध्याकाळी 5 वाजता इंटर-स्टेट बॉर्डरवर जमा झाले आणि बस रोकल्या.
- त्यानंतर एसआय मोहन यांनी 20 लोकांच्या टीमसोबत तेथे धाव घेतली आणि आंदोलनकर्त्यांना समजुन सांगितले की, तुम्ही शांततेत आंदोलन करा.
- त्यानंतर त्यांनी लोकांचा पाटलाग करून आंदोलनकर्त्यांना तेथून पळवून लावले. आंदोलन संध्याकाळी 6 पर्यंत शांत झाले होते.
मोहन यांची होत आहे चर्चा
- एसआय मोहन यांच्या या शौर्यासाठी पोलिस आधिकारी आणि मंत्री त्यांची तारीफ करत आहेत. त्यानतंर केएसआरटीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर तोमिन जे थाचन्करीने यांनी देखील मोहन यांना फोन करून त्यांची तारीफ केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.