राष्ट्रीय / तमिळनाडूतील दांपत्याने चुकून खात्यात आलेले 40 लाख रुपये खर्च केले, आता झाला 3 वर्षांच्या तुरुंगवास

ही रक्कम खासदार आणि आमदार निधी अंतर्गत लोक निर्माण विभागाला जायची होती

दिव्य मराठी वेब

Sep 19,2019 05:30:34 PM IST

तिरुपूर- तमिळनाडुच्या तिरुपूरमध्ये राहणाऱ्या एका दांपत्याने बँक खात्यात चुकीने आलेले 40 लाख रुपये खर्च केले. त्या पैशांतून त्यांनी जमिन खरेदी केली आणि आपल्या मुलीचे लग्नही केले. न्यायालयाने सोमवारी त्यांना आता तीन वर्षांच्या तुरुंगवास झाला आहे. प्रकरण 2012 चे आहे. विमा एजंट वी. गुनसेकरनच्या खात्यात जेव्हा इतकी मोठी रक्कम आली, तेव्हा त्यांनी याची शहानिशाही केली नाही आणि पैसे खर्चून टाकले.

ही रक्कम खासदार आणि आमदार निधी अंतर्गत लोक निर्माण विभागाला जाणारी होती. पण अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीडीवर अभियंत्याच्या नावाऐवजी गुनसेकरन यांचा खाते क्रमांक टाकण्यात आला. दोघांचे खाते तिरुपूरमध्ये कॉरपोरेशन बँकेच्या मेन ब्रँचमध्ये होते.


पैसे परत केले नाही
रुपये ट्रांसफर केल्याच्या 8 महिन्यानंतर जेव्हा अधिकाऱ्यांना पैसे अकाउंटमध्ये न आल्याचे कळाले, तेव्हा त्यांनी बँकेत चौकशी केली. घोळ समोर आल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी गुनसेकरनचे खाते तपासले तेव्हा त्याने सर्व पैसे खर्च केल्याचे समो आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला पैसे परत देण्यास सांगितले. पण तो पैसे परत नाही करू शकला.

X
COMMENT