आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः जेएनयूमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांना भेटल्यामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा चित्रपट 'छपाक' यांना सतत विरोध होत आहे. या निषेधामुळे चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवरही परिणाम झाला असून आता 'छपाक'ला तामिळ रॉकर्सनी नुकसान पोहोचवले आहे. 'छपाक'ची एचडी प्रिंट ऑनलाइन लीक झाली आहे.
पूर्वीपासूनच होता धोका : 'पद्मावत'च्या दोन वर्षांनंतर प्रदर्शित झालेला 'छपाक हा निर्माता म्हणून दीपिकाचा पहिला चित्रपट आहे. 'छपाक'च्या अवघ्या एक दिवसापूर्वी रिलीज झालेला रजनीकांत यांचा 'दरबार' हा चित्रपटही तामिळ रॉकर्सनी ऑनलाईन लीक केले होते. त्यामुळे दीपिकाच्या चित्रपटावर धोका निर्माण झाला की कदाचित हा चित्रपट लीक होईल.
या चित्रपटांनाही बसला फटका : नवनवीन वेबपेजेस तयार करून चित्रपट लीक करणा-या तामिळ रॉकर्सनी यापूर्वी अनेकदा हा गुन्हा केला आहे. चित्रपट लीक केले आहेत. यापूर्वी 'दबंग 3', 'हाऊसफुल 4', 'बाला', 'साहो' आणि '2.0' यासह अनेक चित्रपटांना त्यांनी लक्ष्य केले आहे.
कमी झाली 'छपाक'ची कमाईः बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार या चित्रपटाने मॉर्निंग शोमध्ये चांगली कमाई केली आणि ट्रेड पंडितांच्या मते, चित्रपटाचे संध्याकाळचे कलेक्शनदेखील उत्तम राहिल. पण तसे झाले नाही. हेच कारण आहे की जे कलेक्शन सुमारे 6 कोटीपर्यंत पाहिजे होते, ते केवळ 4.75 कोटींवर गेले आहे.
दीपिकाला जेएनयूमध्ये जाण्याचा बसला फटका? : मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट दिल्लीस्थित अॅसिड हल्ल्यातील वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर याला चांगला प्रतिसाद मिळत होता. चित्रपटाची चांगली सुरुवातही अपेक्षित होती. परंतु मंगळवारी (7 जानेवारी) जेव्हा दीपिका अचानक जेएनयूमध्ये निषेध करीत असलेल्या विद्यार्थांसोबत उभी राहिली तेव्हापासून भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेसह अनेक संस्था तिचा सतत विरोध करत आहेत. सोशल मीडियावर 'छपाक' आणि दीपिकाच्या विरोधात मोहीम सुरू आहेत. तसेच, लोकांना ‘छपाक’च्या जागी ‘तान्हाजी’ पहाण्याचे आवाहन केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.