आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tamil Superstar Rajinikanth On CAA, Says Citizenship Amendment Act Is Not Against Muslims

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुपरस्टार रजनीकांत यांनी केले नागरिकत्व कायद्याचे समर्थन; 'हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही'- रजनीकांत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी या कायद्याविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत- रजनीकांत

चेन्नई- सुपरस्टार रजनीकांतने आज(बुधवार) नागरिकत्व संशोधन कायद्या(सीएए)वर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, "सीएए मुसिलमांच्या विरोधात नाही. जर असे झाले तर सर्वात आधी मी या कायद्याविरोधात आवाज उठवेल." यापूर्वी केंद्र सरकारनेही नागरिकांना स्पष्ट केले आहे की, या कायद्यामुळे देशातील नागरिकांना घाबरण्याची काहीच गरज नाही.

नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर देशभरात कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. यातच सुपरस्टार रजनीकांतने या कायद्याचे समर्थन केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. याबाबत बोलताना रजनीकांत म्हणाले की, "देशाच्या विभाजनानंतर अनेक मुसिलमांनी भारतात राहण्याचे ठरवले. पाकिस्तानातूनही अनेक मुसलमान भारतात राहण्यासाठी आले, त्यांना आता देशाबाहेर काढले जाऊ शकत नाही. काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी सीएएबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. सीएए मुसिलमांच्या विरोधात नाही. जर असे झाले तर सर्वात आधी मी या कायद्याविरोधात आवाज उठवेल." सीएएसोबतच रजनीकांत यांनी राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) चेही समर्थन केले आहे. ते म्हणाले की, "देशाबाहेरुन येणाऱ्या व्यक्तींबद्दल माहिती मिळवण्यासाठी एपीआर गरजेचे आहे. काँग्रेस सरकारने याआधीही हा कायदा लागू केला होता."

पेरियार यांच्यावर दिलेल्या वक्तव्यावर माफी मागण्यास नकार

21 जानेवारीला रजनीकांतने पेरियारवर दिलेल्या आक्षेपार्ह विधानावर माफी मागण्यास नकार दिला आहे. याबाबत ते म्हणाले की, "पेरियार देवाचे कट्टर टीकाकार होते. त्यांनी 1971 च्या एका रॅलीत भगवान राम-सीता यांचे आक्षेपार्ह फोटो दाखवले होते. पण, त्यावेळेस कोणीच त्यांच्या विरोधात काही बोलले नाही." या वक्तव्यानंतर द्रविड संघटनेनं रजनीकांत यांना बिनशर्त माफी मागण्यास सांगितले. पत्रक आणि वृत्तपत्रांची कटिंग दाखवत रजनीकांतने म्हटले होते की, "मी काहीच चुकीचे बोललो नाही. मी माझे म्हणने सिद्ध करू शकतो."