आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजपेयी यांचे सरकार पाडणा-या अद्रमुकचे भाजपशी युतीचे संकेत, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामींनी दिल्लीत घेतली मोदींची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांचा अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्ष (अद्रमुक) भाजपशी युती करू शकतो. मुख्यमंत्री पलानीसामी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर त्याचे संकेत मिळाले. मात्र, ही भेट औपचारिक होती, असे पलानीसामींनी सांगितले, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर याबाबत विचार करू, ते म्हणाले की, ''मी तामिळनाडूचे अनेक मुद्दे पंतप्रधानांसमोर ठेवले. आमच्या दिवंगत नेत्या जे. जयललिता (अम्मा), अण्णा (सी. एन. अण्णादुराई) यांना 'भारतरत्न' दिला जावा, चेन्नई रेल्वे स्थानकाचे नाव अद्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्या नावावर ठेवले जावे, अशा मागण्या मी केल्या." अद्रमुक- भाजपत याआधीही युती झाली होती. जयललितांनी तत्कालीन वाजपेयी सरकारला पाठिंबा दिला होता. काही काळानंतर लगेचच पाठिंबा मागे घेऊन सरकार पाडले होते. 

अजून विजय मिळाला नाही अशा दक्षिणेच्या १२० जागांवर भाजपचे लक्ष 
पलानीसामींनी मोदींकडे जयललिता, अण्णा दुराई यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली. त्यांनी राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीचा मुद्दाही मांडला. 

१९९९ मध्ये अम्मांनी पाडले होते वाजपेयी यांचे सरकार 
१९९९ मध्ये जयललिता मुख्यमंत्री होत्या. त्यांच्या पाठिंब्यावर केंद्रात रालोआचे सरकार होते आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. तेव्हा सोनिया गांधींच्या एका भेटीनंतर जयललितांनी केंद्राचा पाठिंबा मागे घेतला. वाजपेयी सरकारने विश्वास प्रस्ताव मांडला. १७ एप्रिल १९९९ ला लोकसभेत त्यावर मतदान झाले, पण वाजपेयी सरकार फक्त एका मताने हरले. वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला. 

भाजपची अद्रमुकसह द्रमुकवरही आहे नजर 
कर्नाटकनंतर भाजपची नजर या राज्यावर आहे. दक्षिण भारतातील राजकारणात पाय रोवता यावेत अशा संधी आणि पक्षांच्या शोधात सध्या भाजप आहे. दुसरीकडे अद्रमुकलाही मजबूत साथीची गरज आहे. भाजपने द्रमुक या राज्यातील दुसऱ्या प्रमुख राजकीय पक्षावरही नजर ठेवली आहे. डॉ. एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाचे नवे प्रमुख एम. के. स्टॅलिन हे आता भाजप नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. 

एप्रिलपासून परस्परांबद्दल दोघेही नरम, संबंध चांगले झाल्याचा दावा 
तामिळनाडूत सत्ताधारी अद्रमुकने गेल्या एप्रिलपासून भाजपशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत. तेव्हा द्रमुक या मुख्य विरोधी पक्षाच्या नेतृत्वात कावेरी वादावरून निदर्शने सुरू होती. तेव्हा अद्रमुकच्या 'नामादू पुराची थलैवी अम्मा' या मुखपत्रात एका लेखात म्हटले होते की, केंद्र आणि राज्य सरकारचे मजबूत आणि मधुर संबंध कोणी कमकुवत करू शकत नाहीत. देशाच्या राजकारणात अद्रमुक आणि भाजप दोन नळी असलेल्या बंदुकीच्या दोन नळ्यांप्रमाणे काम करतील, असे संकेत स्पष्ट दिसत आहेत. 
 
२०१४ मध्ये ३९ पैकी ३७ जागांवर अद्रमुकचा विजय 
- भाजपची नजर दक्षिणेच्या राज्यांवर आहे. तेथे लोकसभेच्या १२० जागा आहेत. त्यापैकी ३० तर तामिळनाडूतच आहेत. तेथे लोकसभेत हिंदी भाषक राज्यांत होणाऱ्या संभाव्य नुकसानाची भरपाई करण्याची इच्छा भाजपची आहे. 
- २०१४ मध्ये जयललितांच्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढली होती. ३९ पैकी ३७ जागा जिंकून देशात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या ४४ जागांनंतर तिसरे स्थान मिळवले होते. 
 
 

 

बातम्या आणखी आहेत...