आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गँग रेप, 4 नराधमांना अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोइंबतूर - देशात बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. तेलंगणामध्ये एका महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतरच्या दुसर्‍याच दिवशी कोइंबतूरमधील अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अशाचप्रकारची घटना घडल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 22 ते 25 वर्षे वयोगटातील 4 आरोपींना अटक केली आहे.  
पीडिता 26 नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या घरातून निघाली होती. कोइंबतूरच्या सीरानायकनपाल्यम येथील एका पार्कमध्ये तिने आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केल्यानंतर ती एका मित्रासोबत घरी परतत असताना 6 जणांना तिला घेरले. सुरुवातील पीडितेच्या मित्राला मारहाण केली. यानंतर पीडितेला सामसूम ठिकाणी नेऊत तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. पोलिसांच्या मते, आरोपींनी पीडितेसोबत केलेल्या बलात्काराचा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओद्वारे पीडितेला ब्लॅकमेल करून तिला पोलिसांत तक्रार देण्यापासून थांबवत होते. मात्र यानंतरही पीडितीने आपल्या घरी आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 

अद्यापही दोन आरोपी फरार


या प्रकरणातील चारही आरोपींना पॉस्को कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. कार्तिकेयन, राहुल, प्रकाश आणि नारायणमूर्ति असे आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींना महिला न्यायालयात हजर केले, तेथून त्यांना कोइंबतूर मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. दरम्यान दोन मुख्य सुत्रधार असलेले दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. त्यांना अटक करण्यासाठी कोइंबतूर शहर पोलिसांनी दोन विशेष पथके तयार केली आहेत.