आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tamilnadu Village Odanthurai Gram Panchayat 19 Lakhs Income From The Sale Of Electricity

50 हजारांचे बिल पाहून ग्रामपंचायतीने सुरू केली वीजनिर्मिती; आता विजेच्या विक्रीतून 19 लाखांची कमाई, गावात पक्की घरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडनथुरईहून शिवानी चतुर्वेदी काेइम्बतूरपासून ४० किमी अंतरावरील ओडनथुराई परिसरातील गावे स्वयंपूर्ण हाेण्याची अनाेखी कहाणी चर्चेत आली आहे. येथील ११ गावांतील प्रत्येक घराचे पक्के बांधकाम आहे. रस्ते सिमेंटचे आहेत. दर १०० मीटरवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि घराघरात शाैचालय आहे. ओडनथुरई ग्रामपंचायतीने केवळ आपल्या गरजेपुरती वीजनिर्मिती केली नाही तर त्यांनी ती तामिळनाडू इलेक्ट्रिसिटी बाेर्डाला(टीएनईबी) विकली आहे. यातून त्यांना वार्षिक १९ लाख रुपये उत्पन्न मिळते. असा प्रयाेग करणारी ही देशातील एकमेव ग्रामपंचायत आहे. विशेष म्हणजे सर्व घरांना वीज माेफत आहे. अशा या अनाेख्या कारणामुळे जागतिक बँकेचे तज्ञ, देशभरातील सरकारी अधिकारी आणि ४३ देशांतील विद्यार्थ्यांनी या गावाला भेट दिली आहे. बदलाची ही सुरुवात २३ वर्षांपूर्वी सुरू झाली हाेती. तेव्हा लहान-लहान झाेपड्यांत राहणाऱ्या गरिबांना अनेक असुविधा सहन कराव्या लागत हाेत्या. १९९६ मध्ये सरपंच राहिलेले आर. षण्मुगम या बदलाचे प्रणेते आहेत. ते म्हणतात, त्या वेळी दरमहा वीज बिल २००० रुपये येत हाेते. पुढील एका वर्षात पंचायतीने विहिरी खाेदल्या, पथदिवे बसवले. परिणामी बिल ५० हजारांपर्यंत पाेहाेचले. यावर उपाय म्हणून बायाेगॅस प्लँटद्वारे वीजनिर्मिती करण्यासाठी बडाेद्यात प्रशिक्षण घेतले. यामुळे वीज बिल अर्ध्यावर आले. हा प्रयाेग यशस्वी झाल्यावर दाेन गावांत साैरऊर्जेवरील पथदिवे बसवले. यातून वीज बिलात आणखी कपात झाली. यानंतर २००६ मध्ये षण्मुगम यांना पवनचक्की स्थापण्याची कल्पना सुचली. मात्र, पंचायतीकडे केवळ ४० लाख रुपयांचाच राखीव निधी हाेता. पवनचक्की टर्बाइन १.५५ काेटी रुपयांचे हाेते. षण्मुगम यांनी पंचायतीच्या नावे बँकेकडून कर्ज घेऊन ओडनथुरईहून ११० किमी अंतरावर पवनचक्की स्थापन केली. पुढील सात वर्षांत पंचायतीने बँकेचे पूर्ण कर्ज चुकते केले.  अशा पद्धतीने ३ वर्षांत गाव विजेबाबत स्वयंपूर्ण झाले आणि उत्पादन खर्च शून्यावर आला. मात्र, हायहाेल्टेज लाइन नसल्यामुळे ११ गावांतील लाेक अद्यापही वीज मंडळावर अवलंबून हाेते. त्यामुळे षण्मुगम यांनी एकीकृत साैर व पवनऊर्जा प्रणाली स्वीकारली. घराच्या छतावर साैर पाते बसवले. घरांत दिवसा वीज साैर पात्यातून मिळते आणि रात्री पवनचक्कीतून. ओडनथुरई ग्रामपंचायत वीज विक्रीतून १९ लाख वार्षिक उत्पन्न मिळवते. ही ११ गावांच्या विकासकामांत वापरली जाते. यामुळे लाेकांचा जीवनस्तर सुधारला आहे. राज्य सरकारच्या साेलार पाॅवर्ड ग्रीन हाऊस स्कीमअंतर्गत ९५० घरे बांधली आहेत. अडीच-अडीच लाख रुपयांच्या खर्चातून ही घरे ३०० चाै. क्षेत्रात बांधली आहेत.

बातम्या आणखी आहेत...