आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजच्या टॉयलेटमध्ये नराधमाने काढली विद्यार्थिनीची छेड, पोलिसांत तक्रार दाखल करताच तिच्यावरच केला आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कानपूर (उत्तरप्रदेश) : नौबस्ता भागातील बृहस्पति वुमेन कॉलेजमध्ये विद्यार्थिनीची छेड काढल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथील बी.ए. चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने कॉलेज व्यवस्थापकावर छेडछाड केल्याचा आरोप केला. विद्यार्थिनी टॉयलेटमध्ये गेली असता तेथे तिच्यासोबत छेडछाड झाली होती. हे प्रकरण पोलिसांत गेले आहे. 

 

पीडिताने केला विरोध, भविष्य उद्ध्वस्त करण्याची दिली धमकी 

- शुक्रवारी टॉयलेटमध्ये गेली होती. तिच्या पाठोपाठ कॉलेजचा व्यवस्थापक रत्नाकर शुक्ला तेथे गेला. नराधमाने तेथे पीडितासोबत गैरवर्तन केले. पीडिताने याचा विरोध केला असता त्याने तिचे भविष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा पीडिताने आरोप केला आहे. 

- घडलेल्या प्रकारानंतर विद्यार्थिनी थेट घरी आली आणि तिने घरच्यांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर तिने घरच्यांसोबत पोलिसांत तक्रार दाखल केली. 

 

व्यवस्थापकाने केला विद्यार्थिनीवर उलट आरोप

- कॉलेजमध्ये मोबाइल वापरण्यावर बंदी आहे. ती विद्यार्थिनी मोबाइलवर बोलताना दिसली असता तिला वॉर्निंग देण्यात आली होती. याचाच राग काढण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचे व्यवस्थापकाने सांगितले आहे. 

- नौबस्ता पोलिस संबंधीत प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी कॉलेजच्या CCTV कॅमेराचे फुटेज मागवले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...