आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तानाजी सावंत यांच्या कारच्या धडकेत तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, वाहनातील नातेवाइक पसार; संतप्त जमावाकडून तोडफोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महाराष्ट्र सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या वाहनाने एका युवा शेतकऱ्याला चिरडले. मूळचा शेलगाव असलेला युवा शेतकरी सोमवारी सकाळी आपला भाजीपाला विकून परत येत होता. त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या एका फॉर्च्युनर गाडीने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाहनचालक आणि त्यासोबत असलेली व्यक्ती पसार झाले. त्यावरून संतप्त गावकऱ्यांनी वाहनाची तोडफोड केली. आता या वाहनात ड्रायव्हरसोबत कोण होता याचा शोध घेतला जात आहे.

बार्शी-लातूर बायपास रोडवरील BIT कॉलेजनजवळच्या शेळगाव फाट्याजवळ फॉर्चुनर गाडीने स्प्लेंडर NXG MH13AQ 2782 या बाइकला धडक दिली. या भीषण अपघातात श्याम कुमार देविदास व्हळे (40) यांचा जागीच मृत्यू झाला. फॉर्च्युनर गाडी ही तानाजी सावंत यांच्याच नावे असल्याचे समजते. परंतु, या वाहनात तानाजी सावंत नव्हते तर त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य होते असे सांगितले जात आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने तानाजी सावंत यांच्या वाहनाची तोडफोड केली. पोलिस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.