आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलचा फर्स्ट लूक आला समोर, मराठमोळ्या सावित्रीबाई मालसुरेंच्या भूमिकेत झळकणार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'तानाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून अजय देवगण आणि काजोल ही रिअल लाईफ जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या चित्रपटातील अजय देवगणचा फर्स्ट लूक यापूर्वीच आपण सगळ्यांनी पाहिला आहे. आता या चित्रपटातील काजोलचा लूक समोर आला आहे. चित्रपटात काजोलने तानाजींची पत्नी सावित्रीबाई मालसुरेंची भूमिका वठवली आहे. 

काजोल आणि अजय देवगण या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटातील काजोलचा लूक रिव्हील केला आहे. काजोलने आपला लूक शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, 'मैं आपको हारने नहीं दुंगी...'चित्रपटातील पोस्टरमध्ये काजोल मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. तिच्या डोक्यावर पदर, नाकात पारंपरिक नथ आणि कपाळावर मोठी टिकली दिसतेय. या रुपात काजोल अतिशय सुंदर दिसतेय. 

काजोलपूर्वी चित्रपटातील अजय देवगण, शरद केळकर, सैफ अली खान, पद्मावती राव यांचे लूक समोर आले होते. चित्रपटात अजय देवगण तानाजी मालसुरेंच्या भूमिकेत आहे. तर शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका वठवली आहे.

पद्मावती राव यांनी जिजामाताची भूमिका साकारली आहे.

सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. 

‘तानाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे. 150 कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल 13 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.