आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दीपिका पदुकोणच्या 'छपाक'पेक्षा अजय देवगण स्टारर 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने जवळपास चारपट अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, 'छपाक'ने 4.75 कोटी रुपयांची कमाई केली, तर पहिल्याच दिवशी 'तान्हाजी'ने 16 कोटी रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे, 'तान्हाजी' हा अजय देवगणच्या कारकिर्दीचा 100 वा चित्रपट आहे आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांनी त्याकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवला होता.
व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, 'तान्हाजी'ने पहिल्या दिवशी 15.10 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, दुपारनंतर या कलेक्शनमध्ये वेगाने वाढ झाली. पॉझिटिव्ह माऊथ पब्लिसिटीळे, दुसर्या आणि तिसर्या दिवशी कमाईत मोठी वाढ होऊ शकते.
आदर्श यांच्या ट्विटनुसार, 'छपाक'ने पहिल्या दिवशी 4.77 कोटींची कमाई केली. आदर्श यांनी लिहिले, वीकेण्ड कलेक्शनसाठी शनिवार आणि रविवारच्या कमाईच्या आकड्यात वाढ होणे खूप महत्वाचे आहे.
'तान्हाजी' एकूण 4540 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. यामध्ये भारतातील 3880 आणि परदेशातील 660 स्क्रीनचा समावेश आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषांमध्ये 2 डी आणि 3 डी स्वरूपात प्रदर्शित झाला आहे. दुसरीकडे, 'छपाक' भारताच्या 1700 आणि परेदशातील 460 सह एकूण 2160 स्क्रीनवर रिलीज झाला आहे.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, या चित्रपटाने मॉर्निंग शोमध्ये चांगली कमाई केली आणि संध्याकाळच्या कलेक्शनमध्येही वाढ होईल, असा ट्रेड एक्सपर्टचे मत होते. पण तसे झाले नाही. याच कारणामुळे जे कलेक्शन 6 कोटी पर्यंत पोहोचायला पाहिजे होते ते 4.75 कोटींवर राहिले.
मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट दिल्लीस्थित अॅसिड हल्ल्यातील वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर याला चांगला प्रतिसाद मिळत होता. चित्रपटाची चांगली सुरुवातही अपेक्षित होती. परंतु मंगळवारी (7 जानेवारी) जेव्हा दीपिका अचानक जेएनयूमध्ये निषेध करीत असलेल्या विद्यार्थांसोबत उभी राहिली तेव्हापासून भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेसह अनेक संस्था तिचा सतत विरोध करत आहेत. सोशल मीडियावर 'छपाक' आणि दीपिकाच्या विरोधात मोहीम सुरू आहेत. तसेच, लोकांना ‘छपाक’च्या जागी ‘तान्हाजी’ पहाण्याचे आवाहन केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.