आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तानाजी' महाराष्ट्रात टॅक्स फ्री, मंत्रिमंडळासोबत चित्रपट पाहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अजय देवगणचा तानाजी चित्रपट हरियाणा आणि उत्तर प्रदेशानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटात अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळ सुद्धा पाहायला जाणार आहे असेही यावेळी जाहीर करण्यात आले आहे. सीएम ठाकरे यापूर्वीच हा चित्रपट पाहणार होते. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

तत्पूर्वी मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी विशेष आयोजन केले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील नाशिकमध्ये चित्रपट पाहिला. एवढेच नव्हे, तर भारतीय संरक्षण विभागाच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी एकत्रितरित्या हा चित्रपट पाहिला. त्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. अजय देवगणने ट्विट करून हा आपल्यासाठी एक सन्मान असल्याचे म्हटले होते. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.