आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tanhaji The Unsung Warrior Box Office Day 15: Ajay Devgn Film Crosses 200 Crore Mark At Box Office On Day 15

'तानाजी'ने जमवला तब्बल 200 कोटींचा गल्ला, एकूण कमाई 250 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 202.83 कोटी रुपये

बॉलिवूड डेस्क- अजय देवगन स्टारर 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर'ने 15 दिवसात 200 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाने तिसऱ्या शुक्रवारी(24 जानेवारी) 5.38 कोटी रुपयांची कमाई केली. यासोबतच चित्रपटाचे आतापर्यंचे कलेक्शन 202.83 कोटी रुपये झाले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या ट्वीटनुसार, आज(शनिवार)च्या कमाईसोबतच हा अजय देवगनची सर्वात जास्त कमाई करणाचा चित्रपट ठरेल.

तरण आदर्शने आपल्या ट्वीटमध्ये लिहीले, "तान्हाजी 200 कोटींच्या पुढे. चित्रपट थांबण्याचे नावच घेत नाहीये. कमी शो आणि दोन मोठे चित्रपट आले तरीदेखील चित्रपट चांगली कमाई करत आहे. आज (शनिवार) अजय देवगनचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरेल." सध्या अजय देवगनचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'गोलमाल अगेन' आहे. या चित्रपटाने 24 दिवसात 200 कोटींचा आकडा पार करत एकूण कमाई 205.69 कोटींची केली होती.