आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Tanhaji The Unsung Warrior Marathi Teaser Release Trailer To Be Released Tomorrow

'तान्हाजी द अनसंग वॉरिअर'चा मराठी टीजर रिलीज, उद्या येणार ट्रेलर, अजय देवगण म्हणाला - 'गड आला पण सिंह गेला'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या दिमाखदार जीवनाची छाप भारतीय इतिहासावर आजही कायम असून आता मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे! दृश्यात्मक रोमांचाने परिपूर्ण असलेला 'तान्हाजी: द अनसंग वॉरीयर' हा चित्रपट हिंदीसह मराठी वर्जनमध्ये प्रदर्शित होत असून संपूर्ण महाराष्ट्रात 10 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे. अभिनेता अजय देवगणने नुकताच मराठी चित्रपटाचा 15 सेकंदांचा टीजर रिलीज केला आहे.

इन्स्टाग्रामवर टीजर रिलीज करुन ''गड आला पण सिंह गेला. Witness this epic journey in Marathi! #TanhajiMarathiTrailer out tomorrow. #TanhajiTheUnsungWarrior'' हे कॅप्शन दिले आहे. टीजरमध्ये अजय देवगणची झलक दिसत आहे. उद्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.