आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमदार अॅक्शनचे परिपूर्ण पॅकेज आहे 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर', पुन्हा चालली अजयची जादू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग3.5/5
स्टारकास्टअजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे
दिग्दर्शकओम राऊत
निर्माताअजय देवगण, भूषण कुमार, कृष्ण कुमार
संगीतकारअजय अतुल, सचेत परम्परा, मेहुल व्यास, संदीप शिरोडकर
श्रेणीऐतिहासिकपट
कालावधी134 मिनिटे

बॉलिवूड डेस्कः जानेवारी 2020 च्या दुस-या आठवड्यात प्रदर्शित झालेला 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चित्रपट ठरू शकेल. इतिहासामध्ये रस असणार्‍या दर्शकांनी हा चित्रपट अवश्य पहावा. तान्हाजी मालुसरे यांचे वडील मुघलांविरूद्ध लढले आणि श्वासाच्या शेवटच्या क्षणी स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी मुलगा तान्हाजीवर सोपवली. 

  • अशी आहे मराठा योद्धाची दमदार कथा

तान्हाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चांगले मित्र आणि शूर योद्धा आहेत. एकीकडे, तान्हाजी यांच्या मुलाचे लग्न ठरले आहे, ते शिवाजी महाराजांना आमंत्रित करण्यासाठी जातात. तेव्हा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराज तान्हाजी मालुसरे यांच्यावर सोपवतात. मुलाच्या लग्नाची तयारी अर्धवट सोडत आधी लगीन कोंढाण्याचं मग लगीन रायबाचं म्हणत कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा ते उचलतात. तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर गाजवलेला पराक्रम या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे.   या ऐतिहासिक चित्रपटात अजय देवगन, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर, देवदत्त नागे यांनी आपल्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे. तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय देवगण, शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर, उदयभान राठोडच्या भूमिकेत सैफ अली खान, सावित्रीबाई मालुसरेंच्या भूमिकेत काजोल आणि सुर्याजी मालुसरेंच्या भूमिकेत देवदत्त नागे चित्रपटात झळकले आहेत. हे सगळेच त्यांच्या भूमिकेत शोभून दिसले आहेत.  हा चित्रपट त्यातील अॅक्शनसाठी नक्कीच बघायला हवा. चित्रपटातील सर्व अॅक्शन सीन्स अंगावर रोमांच उभे करणारे आहेत.  चित्रपटाची तांत्रिक बाजूही उत्तम आहे. हा चित्रपट 3 डी मध्ये बनविला गेला आहे. थ्रीडीच्या दृष्टिकोनातून तलवार बाजीचे काही सीन खूप रंजक बनले आहेत. चित्रपटातील संपूर्ण व्हीएफएक्सचे शूटिंग भारतात केले गेले आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांचा 'तान्हाजी' हा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात ओम राऊत यांनी कमालीचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला 5 पैकी साडेतीन स्टार दिले जाऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...