ठाणे जिल्ह्यातील 138 / ठाणे जिल्ह्यातील 138 गावे तंटामुक्त

May 20,2011 06:06:14 PM IST

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील सुमारे १३८ गावे तंटामुक्तीच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. या गावांनी केलेल्या स्वयंमूल्यांकनात तंटामुक्तीची घोषणा केली असून, आता जिल्हा मूल्यांकन समितीच्या अहवालानंतर तंटामुक्त गावांची अंतिम घोषणा होईल.

या तंटामुक्तीच्या कामाची दखल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतली असून तंटामुक्त योजनेची परिषद भरविण्याचा मान ठाण्याला देण्यात आला आहे. महाराष्ट्रात १५ ऑगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यात एकूण ८५६ गावे असून त्यापैकी पहिल्या वर्षी ३९ गावे तंटामुक्त जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर सन २००८-०९मध्ये १४९, ०९-१० मध्ये ९१ गावांची निवड झाली होती. यंदा पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली तंटामुक्त गावांची मोहीम अधिक प्रभावी करण्यात आली होती.

गावपातळीवर किरकोळ कारणावरून होणाऱ्या तंट्यांचे पर्यवसन गंभीर तंट्यात होऊ नये, वादात अथिर्क मालमत्ता अडकवून आर्थिक नुकसान होऊ नये, जातीय तणाव वाढू नये, गुन्हेगारी नियंत्रणात रहावी, लोकसहभागातून शक्यतो सामोपचाराने आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन तंटा सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

X