आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंत्र साधना कि कुकर्म..... 24 तासांपासून गायब झालेल्या मुलाल शोधत होते कुटुंबीय, जंगलात अनेक तुकड्यांमध्ये मिळाला मुलाचा मृतदेह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इटावा (उत्तर प्रदेश) : हरिदासपूर गावाजवळील जंगलात एका विद्यार्थ्याचा तुकडे तुकडे झालेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हरिदासपुरा गावातील एक मुलगा 24 तासांपासून गायब असल्याचे सांगितले जात होते. कुटुंबीयांनी दिवसभर शोध घेतल्यानंतर तो सापडला नाही. अखेर पोलिस ठाण्यात त्याच्या हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. कुटुंबीयांनी गावाजवळील जंगलात राहणाऱ्या एका तांत्रिकावर मुलासोबत कुकर्म आणि त्यानंतर त्याची हत्या करण्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तांत्रिकाला ताब्यात घेतले आहे. 

 

हरिदासपुरा गावातील 14 वर्षीय बॉबी रविवारपासून हरवला होता. गावकऱ्यांना दिवसभर मुलाचा शोध घेतला पण तो सापडला नाही. पोलिसांत हरविल्याचे तक्रार दाखल करण्यात आली. पण पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी  जंगलाच्या आजुबाजूला शोध घेतला असता तेथे एका मुलाचा कुऱ्डाहीने कापलेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती.