आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Human Sacrifice: माझ्या मुलाचा बळी देतोय, परवानगी द्यावी! मांत्रिकाचे उप-विभागीय अधिकाऱ्यांना पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या बेगुसराय जिल्ह्याच्या उप-विभागीय अधिकाऱ्याने आलेल्या पत्रावरून एकच खळबळ उडाली. एका मांत्रिकाने लिहिल्या या पत्रात प्रशासनाला आपल्याच मुलाचा बळी देण्यासाठी परवानगी मागितली आहे. मी माझ्या मुलाचा बळी देत आहे. प्रशासनाने त्यासाठी परवानगी द्यावी असे त्याने लिहिले आहे. पत्र पाठवणाऱ्याचे नाव सुरेंद्र प्रसाद सिंह असून त्याला पगला बाबा या नावानेही ओळखले जाते. सोशल मीडियावर या पत्राचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. तरीही वरिष्ठ अधिकारी आपल्याला हा पत्र मिळालाच नाही असा दावा करत आहेत.


पत्र समोर आल्यानंतर स्थानिक माध्यमांनी त्या भोंदू बाबाचा एक व्हिडिओ सुद्धा जारी केला. त्यामध्ये तो आपल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना दिसून आला. सुरेंद्र सिंह उर्फ पगला बाबा यात म्हणाला, "मानवी बळी काही गुन्हा नाही. मला असे करण्यासाठी माता कामाख्या देवीने आदेश दिले. त्यात पहिला बळी मी माझ्या मुलाचाच देणार आहे. तो एक अभियंता आहे. त्याने माझ्या मंदिराला निधी देण्यास नकार दिला. तो रावणासारखा आहे." स्थानिकांनी माध्यांशी संवाद साधताना सांगितले, की सिंह गावात पगला बाबा म्हणून कुप्रसिद्ध आहे. तो गावात नेहमीच एक मानवी कवटी घेऊन नग्न फिरत असतो. यापूर्वी त्याने अतिशय विचित्र चाळे करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, यावेळी तो बळी देणार असल्याचा दावा करून कुठे गेला याचा काहीच पत्ता नाही. माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर बेगुसरायचे उप-विभागीय अधिकारी संजीव कुमार चौधरी यांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. अद्याप अशा स्वरुपाचे पत्र मिळाले नाही. तरीही तो कुणी लिहिला याचा कसून शोध घेतला जात आहे.

 

बातम्या आणखी आहेत...