आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tanushree Dutta Admit That She Was Regretted On Her Bold Scene In Aashiq Banaya Aapne Movie

\'आशिक बनाया आपने\'मध्ये इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन दिल्याचा तनुश्री दत्ताला होतोय पश्चाताप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 2005 साली आलेल्या 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून तनुश्री दत्ताने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटात तनुश्रीने बोल्ड सीन दिले होते. आता तनुश्री अचानक प्रसिद्धीझोतात आली आहे. 10 वर्षांपूर्वी हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकरांनी आपल्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. अलीकडेच झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर अनेक आरोप लावले आहेत. दरम्यान तिच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये बोल्ड सीनविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तनुश्री दिसतेय.

 

व्हिडिओ मुलाखतीत तनुश्रीने सांगितले, "आपल्या पहिल्याच चित्रपटात बोल्ड आणि किसींग सीन दिल्याचा मला आजही खेद वाटतोय. भविष्यात कुठल्याही अशा चित्रपटात काम करणार नाही, ज्यात बोल्ड सीन्स करावे लागतील. जर दिग्दर्शकाने सीनची गरज म्हणून बोल्ड सीन करायल लावले तर मी दुस-या अभिनेत्रीला घ्या, असे त्यांना सांगेल."  तनुश्रीचे हे उत्तर रोहित रॉय शॉक्ड होतो आणि तनुश्रीला पुन्हा एकदा अशा चित्रपटात काम करणारच नाही का? असा प्रश्न विचारतो, त्यावर तनुश्रीचे उत्तर नाही असे असते. 


नाना पाटेकर करणार कायदेशीर कारवाई...
नानांनी तनुश्रीचे सर्व आरोप फेटाळून लावत तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. ‘सेटवर 100–200 लोक उपस्थित होते, मग सर्वांसमोर मी तिच्याशी गैरवर्तणूक केले असे ती का म्हणतेय, कोणी काय बोलायचे हे आपण कसे ठरवणार, कोणी काहीही म्हटले तरी मला जे आयुष्यात करायचे आहे तेच मी करणार’ अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

 

बातम्या आणखी आहेत...