आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकरांनी केले होते गैरवर्तन, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे. 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगताना तनुश्रीने हा गौप्यस्फोट केला आहे. 


2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटासाठी एका स्पेशल गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी नाना पाटेकर चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. चित्रीकरणाच्या करारानुसार ते गाणे खरंतर केवळ माझ्या एकटीवर चित्रीत होणे अपेक्षित होतं. मी हा प्रकार दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगितला, पण त्यांनीही मला नाना पाटेकर सांगेल तसे करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक खुलासा तनुश्री हिने ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. 

 

#metoo मोहीमेबद्दल बोलताना तिने नानांनी केलेल्या असभ्य वर्तनावर भाष्य केले. #metoo मोहिम भारतात कधीही यशस्वी होऊ शकत नाही कारण लोक फक्त वादविवादाबद्दल बोलतात मात्र प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा लोक काहीच करत नाही असे ती म्हणाली. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केले हे अनेकांनी पाहिले पण कोणीही माझ्यामागे उभे राहिलं नाही, सगळ्यांनीच यावेळी केवळ बघ्याची भूमिका निभावली असेही ती म्हणाली.

 

नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. इंडस्ट्रीतील सगळ्यांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही, असेही तनुश्री पुढे म्हणाली. अक्षय कुमार, रजनीकांत यांसारख्या मोठ्या कलाकारांनी नानांसोबत काम करणं थांबवलं पाहिजे, असे मतही तिने यावेळी व्यक्त केले. नाना पाटेकर यांनी गुंडांकरवी मला आणि माझ्या कुटुंबियांना धमकावल्याचेही तनुश्रीने सांगितले. 


तनुश्री दत्ताने 2005 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून ती प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर ढोल, चॉकलेट, रिस्क आणि स्पीडसारखे चित्रपट तनुश्रीने केले आहेत. मात्र, गेल्या 8 वर्षांपासून तनुश्री बॉलिवूडपासून दूर आहे. अलीकडेच ती अमेरिकेतून भारतात परतली आहे. 

बातम्या आणखी आहेत...