आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नानांवर गंभीर आरोप लावणा-या तनुश्रीचा आणखी एक खुलासा, एका अभिनेत्रीने दिला होता ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप करणारी तनुश्री दत्ता ब-याच वर्षांनी लाइमलाइटमध्ये आली आहे. झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत 2008 साली हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवर नानांनी सेक्शुअली हॅरेस केल्याच्या गौप्यस्फोट तिने केला. आता यानंतर तिने पुन्हा एकदा मोठा खुलासा केला आहे. तनुश्रीने कॉस्मेटिक सर्जरी केल्याचे मान्य केले आहे. तिने सांगितल्यानुसार, इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी तिला कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. सुंदर दिसण्यासाठी दातांवर शस्त्रक्रिया करुन घेतल्याचे तनुश्रीने उघड केले आहे. 


TOI ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने सांगितले, "दातांच्या आकारामुळे मला कायम अनकॉन्फिडंट वाटायचे. याच कारणामुळे मी कॉस्मेटिक सर्जरी करुन दातांचा आकार योग्य करुन घेतला." 

 

तनुश्री म्हणाली, एक अभिनेत्री सर्वांनाच द्यायची सर्जरीचा सल्ला...
- तनुश्रीने सांगितल्यानुसार, ''इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीने ब-याच सर्जरी करुन घेतल्या होत्या. ती इतरांनाही कॉस्मेटिक सर्जरीसाठी प्रोत्साहित करायची तिने मला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. पण मी तिचे म्हणणे गांभीर्याने घेतले नव्हते." पण हा सल्ला देणा-या अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख करणे मात्र तनुश्रीने मुलाखतीत टाळले.
- तनुश्री म्हणाली, "फिल्म इंडस्ट्री लोक तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. ती बॉलिवूड अभिनेत्री इतरांना यासाठी सर्जरी करण्यासाठी प्रोत्साहित करायची कारण तिची सर्जरी खराब झाली होती."

 

तनुश्रीने नाना पाटेकरांवर लावले हे आरोप 
- अलीकडेच तनुश्रीने झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अनेक गंभीर लावले आहेत. 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटासाठी एका स्पेशल गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी नाना पाटेकर चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. चित्रीकरणाच्या करारानुसार ते गाणे खरंतर केवळ माझ्या एकटीवर चित्रीत होणे अपेक्षित होतं. मी हा प्रकार दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगितला, पण त्यांनीही मला नाना पाटेकर सांगेल तसे करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक खुलासा तनुश्री हिने या मुलाखतीत केला.
- सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केले हे अनेकांनी पाहिले पण कोणीही माझ्यामागे उभे राहिलं नाही, सगळ्यांनीच यावेळी केवळ बघ्याची भूमिका निभावली असेही ती म्हणाली.
- नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. इंडस्ट्रीतील सगळ्यांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही, असेही तनुश्री पुढे म्हणाली. 
- अक्षय कुमार, रजनीकांत यांसारख्या मोठ्या कलाकारांनी नानांसोबत काम करणं थांबवलं पाहिजे, असे मतही तिने यावेळी व्यक्त केले. - नाना पाटेकर यांनी गुंडांकरवी मला आणि माझ्या कुटुंबियांना धमकावल्याचेही तनुश्रीने सांगितले.
- या प्रकरणात कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी नाना पाटेकरांची बाजु घेतली असता नाना यांच्यासोबत गणेश आचार्य देखील दोषी असून ते खोटं बोलत आहेत. आचार्य दुटप्पी भूमिका घेतात, असे तनुश्रीने म्हटले. 


नाना पाटेकरांनी फेटाळले सर्व आरोप... 
- एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावले. 'तिने हे आरोप का केले हे मी कसे सांगू शकतो? ती असं का बोलत आहे? हे मला कळेल का? लैंगिक शोषणाशी माझा काय संबंध? तिला नेमके काय म्हणायचं आहे? सेटवर माझ्यासोबत 50 ते 100 लोक असायचे', असे नानांनी स्पष्ट केले. 
- 'मी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. पण मीडियाला सांगून काय उपयोग? तुम्ही काहीही बातम्या चालवाल. ज्यांना जे म्हणायचे ते म्हणावे, मी आपले काम करत राहणार', असेही त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...