आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tanushree Dutta Files Protest Petition In MeToo Case First Hearing Was Scheduled For January 17

मीटू प्रकरणाच्या सुनावणीसाठी अमेरिकेहून परतली तनुश्री, म्हणाली - 'मरेपर्यंत नाना पाटेकरला सोडणार नाही'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या विरोधात नोंदवलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात 17 जानेवारीपासून न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होणार आहे. यासाठी तनुश्री अमेरिकेहून मुंबईला परत आली आहे. मुंबईला येताच ती म्हणाली, 'मी सोडणार नाही, अनेक प्रकरणे उघडकीस आणेल. हे लोक थकतील, न्यायालयाच्या पायऱ्या चढून-चढून म्हातारे होतील, परंतु मी त्यांना आनंदाने जगू देणार नाही आणि मरूही देणार नाही.' या प्रकरणी 17 जानेवारी रोजी पहिल्यांदा तनुश्री आपल्या केसमध्ये न्यायालयात हजर राहत आपली बाजू मांडणार आहे.

  • काहीही झाले तरी या प्रकणातून मी माघार घेणार नाही - तनुश्री दत्ता

मुंबईला परत येताच तनुश्री म्हणाली, 'या लोकांनी माझे करिअर खराब केले आहे. त्यामुळे जोपर्यंत मी यांना शिक्षा मिळवून देत नाही तोपर्यंत यांना सोडणार नाही. मी एका छोट्याशा शहरातून बॉलिवूडमध्ये आले होते. बॉलिवूड माझे स्वप्न होते, विश्व होते. इथे मला काम मिळवून देणारा माझा कोणी गॉड फादर, ग्रँड फादर किंवा बॉय फ्रेंड नव्हता. मी बॉलिवूडमध्ये आपल्या कष्टाने आपले छोटेसे स्थान निर्माण केले होते. चांगले चित्रपट आणि आयटम साँगही मिळत होते. चार-पाच वर्षे काम केल्यानंतर आता लग्न करून संसार थाटावा, असे वाटले होते. मात्र, या आरोपींनी संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये मला घाणेरडे ठरवले. परिणामी आज संपूर्ण इंडस्ट्रीत कोणताच मोठा निर्माता-दिग्दर्शक काम देण्यास तयार नाही. एवढे सगळे झाल्यानंतरही या सर्व आरोपींकडे काम आहे. इतकेच नाही तर त्या काळात जी कामे करत होते त्याचे धनादेशही बाउन्स झाले. मी पीडित असूनही उलट माझ्यावरच आरोप लावण्यात आले आहेत. मी कामाला प्राधान्य देते. आता मी थकले आहे. कधीकधी हिंमतही तुटते, परंतु काहीही झाले तरी या प्रकणातून मी माघार घेणार नाही. उच्च न्यायालयापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल.'

  • पूर्ण टीमला मिळत आहेत धमक्या

तनुश्रीचे वकील नितिन सुतपाडे म्हणााले की, फक्त तनुश्रीच नव्हेे तर त्यांच्या पूर्ण वकिलांच्या टीमवर दबाव टाकला जात आहे. केस सोडण्याच्या धमक्या मिळत आहेत. दुसरीकडे मी हार मानणार नाही, असे तनुश्री म्हणाली आहे.

  • काय आहे पूर्ण प्रकरण?

तनुश्रीने 2008 मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह एकूण चार लोकांविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी इंडस्ट्री, पोलिस आणि राजकीय दबावामुळे केस दाखल करण्यात आली नव्हती. त्यानंतर 10 ऑक्टोबर 2018 रोजी भारतात मीटू चळवळीच्यावेळी एफआयआर दाखल करण्यात आली. तनुश्रीचे वकील नितिन सुतपाडे यांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी कोर्टाता पुराव्या आभावी बी-समरी रिपोर्ट दाखल केली तथापि तनुश्रीची साक्ष्य नोंदवून घेतली नाही शिवाय तनुश्रीने बी समरी रिपोर्टवर असहमती दर्शविली होती. तनुश्रीने कोर्टात अर्ज दाखल करून केस रिओपन केली आहे. 17 जानेवारी त्याची पहिली तारीख आहे.

  • राखीवरदेखील करणार कायदेशीर कारवाई

राखी सावंतदेखील तुझ्या विरोधात खूूप काही बोलली आहे, यावर तनुश्री म्हणाली, राखीनने माफी मागितली आहे. मात्र ती सार्वजनिकरित्या माफी मागण्यासाठी तयार नाही. त्यामुळे राखी सावंतवरदेखील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे विचार करत आहे.  

बातम्या आणखी आहेत...